अलिकडेच अफगाणीस्तानवर स्थानिक तालिबान गटाने हल्ला करुन देशाच्या सत्तेवर कब्जा केला. गेल्या 20 वर्षापासून अमेरिकन सैन्याच्या मदतीने सुरू असलेली अफगाणमधील लोकशाही रुजवण्याची प्रक्रिया यामुळे धुळीस मिळाली. तालिबान्यांपासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सामान्य नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला. अफगणाच्या विमानतळावर जीव वाचवण्यासाठी लोकांनी केलेली गर्दी आणि त्यानंतर उद्भवलेली परस्थिती याच्या बातम्या जगभर झळकल्या. याच संकटातून नागरिकांची सुटका करण्यासाठी राबवण्यात आलेल्या मोहीमेवर आधारित ''गरुड'' हा चित्रपट बनणार आहे.
-
FILM ON AFGHAN RESCUE CRISIS... #AjayKapoor - currently producing #Attack [#JohnAbraham] - collaborates with #SubhashKale for #Garud... Based on #Afghan rescue crisis... Director + cast to be announced... Music by #RaviBasrur [#KGF, #KGF2]... 15 Aug 2022 release #IndependenceDay. pic.twitter.com/SQN7wJvKEj
— taran adarsh (@taran_adarsh) September 15, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">FILM ON AFGHAN RESCUE CRISIS... #AjayKapoor - currently producing #Attack [#JohnAbraham] - collaborates with #SubhashKale for #Garud... Based on #Afghan rescue crisis... Director + cast to be announced... Music by #RaviBasrur [#KGF, #KGF2]... 15 Aug 2022 release #IndependenceDay. pic.twitter.com/SQN7wJvKEj
— taran adarsh (@taran_adarsh) September 15, 2021FILM ON AFGHAN RESCUE CRISIS... #AjayKapoor - currently producing #Attack [#JohnAbraham] - collaborates with #SubhashKale for #Garud... Based on #Afghan rescue crisis... Director + cast to be announced... Music by #RaviBasrur [#KGF, #KGF2]... 15 Aug 2022 release #IndependenceDay. pic.twitter.com/SQN7wJvKEj
— taran adarsh (@taran_adarsh) September 15, 2021
अफगाण रेस्क्यू संकटावर चित्रपट "गरुड" हा चित्रपट बनववला जाणार असल्याची माहिती ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी दिली आहे. 'अटॅक' या जॉन अब्राहमसोबतच्या चित्रपटानंतर निर्माता अजय कपूर 'गरुड'ची निर्मिती करणार आहेत. या चित्रपटाचे संगीतकार रवी बसरुर असतील.
'गरुड' चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. 15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट रिलीज होणार आहे.
हेही वाचा - पॉर्न रॅकेट : पुरवणी आरोपपत्रात नाव आल्यानंतर राज कुंद्राने जामीन अर्ज मागे घेतला