ETV Bharat / sitara

टीका करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याने केले सोनू सूदच्या कामाचे कौतुक

सोनू सूदच्या टीमने एका कोविड रुग्णासाठी गंजम जिल्ह्यातील रुग्णालयात बेडची व्यवस्था केली होती. या गोष्टीला जिल्हाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. सोनू किंवा त्याच्या टीमने आमच्याशी कधीही संपर्क साधला नसल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर सोनूने त्याच्याशी रुग्णाचे झालेले चॅटींगचे स्क्रिन शॉट्स व बेड उपलब्ध केल्याचा तपशील शेअर केला. नंतर मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी सोनूच्या कामाचे कौतुक केले.

Ganjam DM praises Sonu Sood
सोनू सूदच्या कामाचे कौतुक
author img

By

Published : May 18, 2021, 7:49 PM IST

मुंबई - सोनू सूद हे अनावश्यक श्रेय घेत असल्याचा आरोप ओडिशातील गंजम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आला होता. मात्र सोनू सूदने उत्तर दिल्यानंतर गंजम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी कोविडच्या काळात सोनू सूद करीत असलेल्या कामाचे कौतुक केले आहे.

सोमवारी सोनू यांनी केलेल्या ट्विटला गंजम डीएमने प्रतिसाद दिला तेव्हा त्यांनी बेहरमपूर येथील गंजम सिटी हॉस्पिटलमध्ये रूग्णासाठी बेडची व्यवस्था केली असल्याचा दावा केला.

जिल्हाधिकारी यांनी केलेल्याट्विटमध्ये लिहिले होते, "आम्हाला सूद फाउंडेशन किंवा सोनू सूदकडून कोणताही संपर्क प्राप्त झालेला नाही. विनंती केलेला रुग्ण हा घरामध्ये आयसोलेशनमध्ये असून स्थिर आहे. बेडचा काहीही प्रश्न नाही. बेहरमपूर कार्पोरेशन याची काळजी घेत आहे,'' असे मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलला टॅग करत सोमवारी ट्विट केले.

सूद यांनी १५ मे रोजी पोस्ट केलेल्या ट्विटला उत्तर म्हणून हे ट्विट केले आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे: "काळजी करू नका. गंजम सिटी हॉस्पिटल, बेरहमपूरमध्ये बेडची व्यवस्था करण्यात आली आहे." , असे सोनू सूदने ट्विट केले होते.

  • Sir, We never claimed that we approached you, it's the needy who approached us & we arranged the bed for him, attatched are the chats for your reference.Ur office is doing a great job & u can double check that we had helped him too.Have DM you his contact details. Jai hind , 🇮🇳 https://t.co/9atQhI3r4b pic.twitter.com/YUam9AsjNQ

    — sonu sood (@SonuSood) May 17, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

उत्तरादाखल सोनूने हे लिहिले होते ते ट्विट हटवण्यात आले आहे. मात्र सोमवारी जिल्हा दंडाधिकाऱयांच्या ट्विटवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सोनूने व्हॉट्सअ‍ॅप संभाषणाचे स्क्रीनशॉट्स शेअर करून सांगितले की, त्याने बेडची व्यवस्था केली आहे कारण रूग्णांचे कुटुंबाने त्याच्याकडे मदतीसाठी संपर्क केला होता.

सोनू यांनी सोमवारी ट्विट केले: “सर, आम्ही कधीच दावा केलेला नाही की आम्ही तुमच्याशी संपर्क केला होता. गरजूने आमच्याशी संपर्क केला होता आणि आम्ही बेडची व्यवस्था केली, त्याचे चॅटींग सोबत तुमच्या माहितीस्तव जोडत आहे. तुमचे कार्यालय महान काम करीत आहे आणि तुम्ही हेही चेक करा की आम्हीही मदत केली आहे. जय हिंद. "

  • Our intention was not to criticise your system. We have our own TEAM GANJAM to ensure bed availability for patient which work 24*7. Still it’s our duty to investigate if any issues about bed availability. That’s why we cleared the facts. You and your Organization doing great job. https://t.co/nBvIvZR7lM

    — Collector & District Magistrate, Ganjam (@Ganjam_Admin) May 17, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काही तासांनंतर डीएम यांनी सोनूचे कौतुक करणारे एक ट्विट पोस्ट केले, ज्यात असे लिहिले आहे की, “आमचा हेतू तुमच्या सिस्टमवर टीका करण्याचा नव्हता. २४ x ७ काम करणाऱया रूग्णांना बेडची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आमची स्वतःची एक टीम गंजम येथे आहे. तरीही बेड उपलब्धतेबद्दल काही प्रकरण असल्यास चौकशी करणे आमचे कर्तव्य आहे. म्हणूनच आम्ही तथ्य स्पष्ट केले. तुम्ही आणि तुमची संस्था चांगली कामगिरी करत आहात. "

सोनूनेही नम्रपणे उत्तर दिले आणि लिहिले की, "आपल्या विनम्र शब्दांबद्दल तुमचे आभार. आमची टीम आमच्या देशासाठी नेहमीच २४ x ७ काम करते. मला कोण केव्हा फोन करते हे महत्त्वाचे नाही. गरजूपर्यंत पोहोचण्याासाठी मी प्रयत्न करीत असतो. जय हिंद."

  • Thank you so much for your kind words.Our team is always there 24/7 for our country.
    Doesn't really matter who calls me when and where I will try my best to reach out to the needy.
    Jai Hind 🇮🇳 https://t.co/gCLNJZMXyZ

सोनू सूदची काही दिवसापूर्वी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. यातून बरा होताच पुन्हा तो लोकांच्या मदतीसाठी काम करीत आहे.

सोनू याला एप्रिलमध्ये मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या कोविड लसीकरण कार्यक्रमाचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले होते. गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान त्याने हजारो प्रवासी सुरक्षितपणे घरी पोहोचण्यास मदत केली होती. त्याने बेरोजगारांना ई-रिक्षासुद्धा पुरविल्या आहेत.

हेही वाचा - ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा जोनास होतेय वारंवार गौरवांकित, देशालाबद्दल वाढवतेय अभिमान!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.