'कोंबडी पळाली' चं हिंदी रिमेक 'चिकनी चमेली', आपल्या बेफाट नृत्य-अदाकारीने प्रसिद्ध करणारी बॉलिवूडची टॉपची नायिका कॅटरििना कैफ सुद्धा कोरोनाच्या तडाख्यातून बाहेर पडली आहे. साधारण १०-१२ दिवस विलगीकरणात राहिल्यानंतर आज तिचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट नकारात्मक आल्यामुळे ती जाम खूष आहे आणि समाज माध्यमांवर तिने तिची ही खुषी सर्वांबरोबर शेयर पण केली आहे.
कालच विकी कौशल ने समाज माध्यमांवरून तो कोव्हीड निगेटिव्ह झाल्याची बातमी टाकली होती आणि आज कतरीना कैफ ने आनंदी होत ती कोव्हीड निगेटिव्ह झाल्याचे कळविले आहे. ‘माझा रिपोर्ट कोव्हीड निगेटिव्ह आलाय. मी कोरोना ने आजारी असताना ज्यांनी ज्यांनी माझ्या तब्येतीची विचारपूस केली आणि काळजी वाहिली त्यांना थँक यू. मला आपली समजण्यासाठी खूप प्रेम.’ अशा आशयाचे पोस्ट टाकले.
#katrinakaif 🌞 negative 🌞( everyone who checked up on me thank u , it was really sweet felt a lot of 💛)
विकी कौशलला ५ एप्रिल रोजी कोरोना झाल्याचे कळले होते आणि त्यासोबतच त्याच्यासोबत ‘मि. लेले’ चे शूट करणारी भूमी पेडणेकरलाही कोरोना झाल्याचे समजले होते. पाठोपाठची कॅटरिना कैफ ६ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह निघाली. असं म्हटलं जात की कतरीना आणि विकी खूप ‘जवळचे मित्र’ आहेत आणि त्यांच्यापैकी एकाला कोरोना झाल्यावर दुसऱ्याला झाला नसता तर नवल वाटले असते. परंतु आता ते दोघेही कोरोनाच्या विळख्यातून सुटले आहेत आणि त्यांची मैत्री अबाधित राहो ही प्रार्थना.
कॅटरिनाचा अक्षय कुमार सोबतचा ‘सूर्यवंशी’ वर्षभरापासून प्रदर्शनासाठी रखडला आहे. तिचे आगामी चित्रपट आहेत सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर बरोबरचा ‘फोन भूत’ आणि सलमान खान सोबतचा ‘टायगर ३’.
हेही वाचा - कोरोनाच्या केसेस वाढत असतानाही तारा सुतारिया, अर्जुन कपूर गोव्यात करताहेत शुटिंग