ETV Bharat / sitara

आयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चा टीझर प्रदर्शित, रिलीज डेटही जाहीर - movie

या टीझरमधून व्यक्तीनुसार बदलत जाणाऱ्या प्रेमाच्या व्याख्या सांगण्यात आल्या आहेत. शुभ मंगल ज्यादा सावधान चित्रपट समलैंगिक संबंधांवर आधारित असणार आहे

'शुभ मंगल ज्यादा सावधान'चा टीझर प्रदर्शित
author img

By

Published : May 10, 2019, 8:39 AM IST

मुंबई - 'शुभ मंगल सावधान' या चित्रपटाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर आता चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'शुभ मंगल ज्यादा सावधान' असे या सिक्वलचे नाव असणार आहे. आता चित्रपटाचं पहिलं टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

या टीझरमधून व्यक्तीनुसार बदलत जाणाऱ्या प्रेमाच्या व्याख्या सांगण्यात आल्या आहेत. शुभ मंगल ज्यादा सावधान चित्रपट समलैंगिक संबंधांवर आधारित असणार आहे. यात अभिनेता आयुष्मान खुराणाची वर्णी लागली आहे. तर त्याच्या अपोझिट कोण झळकणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. पहिल्या भागातून आयुष्मान आणि भूमी पेडणेकरची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

२०२० मध्ये 'व्हॅलेंटाईन डे'ला म्हणजेच १४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हितेश केवाल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून आनंद एल राय यांची निर्मिती असणार आहे.

Intro:Body:

ent news 1

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.