मुंबई - श्रद्धा कपूर लवकरच दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. दोन्ही बड्या कलाकारांसोबतच चित्रपटाच्या भव्यतेमुळे 'साहो' हा सिनेमा सुरूवातीपासूनच चर्चेत राहिला. आता चित्रपटातील पहिलं गाणंही प्रदर्शित करण्यात आलं आहे.
'सायको सय्या' असं या गाण्याचं शीर्षक आहे. प्रभासनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हे गाणं शेअर करत म्हटलं आहे. आमच्या चित्रपटातील पहिलं गाणं, आशा करतो तुमच्या पसंतीस उतरेल आणि तुम्ही त्याचा आनंद घ्याल. या गाण्यात श्रद्धा आणि प्रभासच्या खास डान्सची झलक पाहायला मिळत आहे.
-
Hey darlings... Here comes the first song from our film, The Psycho Saiyaan.. Hope you all enjoy it.. - #Prabhashttps://t.co/jAUocIyd8d#Saaho@shraddhakapoor @neilnitinmukesh @sujeethsign @tanishk_bagchi @dhvanibhanushali22 #BhushanKumar @uvcreationsofficial @TSeries
— Prabhas (@PrabhasRaju) July 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Hey darlings... Here comes the first song from our film, The Psycho Saiyaan.. Hope you all enjoy it.. - #Prabhashttps://t.co/jAUocIyd8d#Saaho@shraddhakapoor @neilnitinmukesh @sujeethsign @tanishk_bagchi @dhvanibhanushali22 #BhushanKumar @uvcreationsofficial @TSeries
— Prabhas (@PrabhasRaju) July 8, 2019Hey darlings... Here comes the first song from our film, The Psycho Saiyaan.. Hope you all enjoy it.. - #Prabhashttps://t.co/jAUocIyd8d#Saaho@shraddhakapoor @neilnitinmukesh @sujeethsign @tanishk_bagchi @dhvanibhanushali22 #BhushanKumar @uvcreationsofficial @TSeries
— Prabhas (@PrabhasRaju) July 8, 2019
गाण्याला सचेत टंडन, धवनी भानूशाली आणि तनिष्क बागची यांनी आवाज दिला आहे. विशेष म्हणजे हे गाणं एकाच वेळी चार भाषेत प्रदर्शित करण्यात आलं आहे. यात हिंदी, तेलुगू, तमिळसह मल्लयाळम भाषेचा समावेश आहे. आता श्रद्धा प्रभासचं हे गाणं प्रेक्षकांची मनं जिंकणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.