ETV Bharat / sitara

प्रभासच्या साहोनं पहिल्या दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला - केसरी

साहो चित्रपट हिंदीसह तेलुगू आणि तामिळ भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे. या सर्व भाषांमध्ये मिळून या सिनेमाने ६८ कोटींचा गल्ला जमवला असल्याचे वृत्त समोर आले आहे.

साहोनं पहिल्या दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला
author img

By

Published : Aug 31, 2019, 4:06 PM IST

मुंबई - प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला साहो सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला. प्रभासचे डायहार्ट फॅन्स या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. अशात आता चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई समोर आली आहे. या सिनेमाच्या केवळ हिंदी व्हर्जननेच २४ कोटींचा गल्ला जमवला आहे.

साहो चित्रपट हिंदीसह तेलुगू आणि तामिळ भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे. या सर्व भाषांमध्ये मिळून या सिनेमाने ६८ कोटींचा गल्ला जमवला असल्याचे वृत्त समोर आले आहे. ३५० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' आणि 'अॅव्हेंजर्स एंडगेम'चा पहिल्या दिवशीच्या कमाईचा रेकॉर्डही मोडला आहे.

  • #Saaho has a superb Day 1... Prabhas’ superstardom post #Baahubali2 + hype surrounding the biggie + excellent advance bookings ensured fantastic numbers... Day 2 and 3 biz crucial to pack a solid weekend total... Fri ₹ 24.40 cr Nett BOC. India biz. #Hindi version.

    — taran adarsh (@taran_adarsh) August 31, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तर चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने वर्षभरात प्रदर्शित झालेल्या भारत, कंलक, केसरी, मिशन मंगलसारख्या सिनेमांचे पहिल्या दिवशीच्या कमाईचे रेकॉर्ड तोडले आहेत. आता शनिवार रविवारच्या सुट्टीचा फायदाही सिनेमाच्या कलेक्शनला होणार असल्याने हा चित्रपट विकेंडपर्यंत किती गल्ला जमवणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.