ETV Bharat / sitara

भेटा 'दसवी'च्या गंगाराम चौधरी आणि ज्योती देस्वालला!

author img

By

Published : Feb 23, 2021, 12:30 PM IST

नुकताच 'दसवी'च्या चित्रीकरणास प्रारंभ झाला. यात अभिषेक बच्चन गंगाराम चौधरी ही व्यक्तिरेखा साकारत असून तो एका अपयशी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 'दसवी'मध्ये अभिषेक बच्चन बरोबर यामी गौतम काम करीत असून ती ज्योती देस्वाल नामक पोलिस ऑफिसची भूमिका साकारत आहे.

Filming of 'Dasavi' starring Abhishek Bachchan
अभिषेक बच्चन बरोबर यामी गौतम

मुंबई - लॉकडाऊन उठल्यावर अडकलेल्या अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणास सुरूवात झाली. नुकताच 'दसवी'च्या चित्रीकरणास प्रारंभ झाला. यात अभिषेक बच्चन गंगाराम चौधरी ही व्यक्तिरेखा साकारत असून तो एका अपयशी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 'दसवी' हा आजच्या समाजातील शिक्षणाचे महत्त्व सांगणारा एक राजकीय विनोदी चित्रपट आहे. एका भ्रष्ट राजकारण्याच्या प्रवासाची कथा यातून उलगडली जाणार असून त्यात वास्तविक राजकारणाची मांडणी करण्यात आली आहे.

'दसवी'मध्ये अभिषेक बच्चन बरोबर यामी गौतम काम करीत असून ती ज्योती देस्वाल नामक पोलिस ऑफिसची भूमिका साकारत आहे. तिची व्यक्तिरेखा हरयाणवी असून यामीने त्यासाठी त्या भाषेचे धडे गिरविले आहेत. या चित्रपटातून अभिषेक व यामी एकमेकांसमोर ठाकलेले बघायला मिळेल. यात निमरत कौर सुद्धा असून तो एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

दसवीची कथा रितेश शहा यांची असून तुषार जलोटा या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनीय पदार्पण करताहेत. मॅडॉ्क फिल्म्स प्रॉडक्शन्स, बेक माय केक फिल्म्स च्या सहयोगाने या चित्रपटांची निर्मिती झाली आहे. हिंदी मिडीयम, अंग्रेजी मिडीयम, बाला सारख्या चित्रपटांच्या निर्मितीनंतर त्यांचा पुढील चित्रपट आहे 'दसवी'.

ही एक सोशल कॉमेडी असून यात अभिषेक बच्चन, यामी गौतम व निमरत कौर यांच्या भूमिका आहेत. याची प्रस्तुती केलीय जियो स्टुडिओज आणि दिनेश वीजन यांनी. तसेच 'दसवी' चे निर्माते आहेत संदीप लेयझेल, शोभना यादव आणि दिनेश वीजन.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.