ETV Bharat / sitara

Farhan Shibani Wedding : फरहान अख्तरच्या मुलींनी केला शिबानी दांडेकरसोबत डान्स - फरहान अख्तरच्या मुलींचा डान्स

फरहान अख्तरच्या मोठ्या झालेल्या मुली शाक्य ( वय 21) आणि अकिरा ( वय 15 ) शिबानी दांडेकरसोबत त्याच्या लग्नाला हजर होत्या. बुधवारी त्याने शेअर केलेल्या स्वप्नवत लग्नातील अनेक फोटोमध्ये या मुली झळकल्या आहेत.

शिबानीसोबत फरहानच्या मुलींचा डान्स
शिबानीसोबत फरहानच्या मुलींचा डान्स
author img

By

Published : Feb 23, 2022, 6:11 PM IST

मुंबई - चित्रपट निर्माता फरहान अख्तर आणि अभिनेत्री-होस्ट शिबानी दांडेकर यांनी बुधवारी त्यांच्या लग्न समारंभातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यातील काही फोटोंमध्ये फरहानच्या मुलीही १९ फेब्रुवारीला झालेल्या लग्नात आनंदाने नाचताना दिसत आहेत.

फरहान आणि शिबानी यांनी चार वर्षांहून अधिक डेटिंग केल्यानंतर, मुंबईच्या जवळ असलेल्या खंडाळा येथील फार्महाऊसवर जवळचे कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत शपथ घेतली. सोशल मीडियावर या सोहळ्यातील असंख्य फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते.

विवाहप्रंगी मुली शाक्य आणि अकिरा फुलांचे पुष्पगुच्छ धरलेल्या दिसत आहेत

पटकथा लेखक जावेद अख्तर आणि हनी इराणी यांचा मुलगा फरहानने यापूर्वी सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट अधुना भाबानीशी लग्न केले होते. लग्नाच्या 16 वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना शाक्य ( वय 21) आणि अकिरा ( वय 15 ) या दोन मुली आहेत. दोघींनीही वडिलाच्या लग्नात उत्सहाने सहभाग घेतला होता.

फरहान अख्तरच्या मुलींचा डान्स
फरहान अख्तरच्या मुलींचा डान्स

फरहानने इंस्टाग्रामवर काही फोटोशेअर केले ज्यात फरहान आणि शिबानी लग्नाची शपथ घेत होते तेव्हा त्याच्या मुली शाक्य आणि अकिरा फुलांचे पुष्पगुच्छ धरलेल्या दिसत आहेत. दुसऱ्या एका फोटोत फरहान आपल्या मुलींसोबत आनंदी फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. फरहान आणि शिबानीच्या लग्नात शाक्य आणि अकिरा यांनीही डान्स केला होता.

कामाच्या आघाडीवर फरहान 'जी ले जरा' नावाच्या रोड ट्रिप चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाकडे परतणार आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रा, कॅटरिना कैफ आणि आलिया भट्ट एकत्र आहेत. शिबानी आगामी २०१३ च्या हिट हिंदी कॉमेडी 'क्वीन' चित्रपटाच्या मल्याळम आणि तेलुगु रिमेकमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा - Farhan Shibani Romance : विवाह सोहळ्यात फरहान शिबानीचा रोमान्स, जावेद अख्तरनेही केला सुनेसोबत डान्स

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.