ETV Bharat / sitara

चला हवा येऊ द्या च्या मंचावर फराह खान - ZEE MARATHI

झी टीव्हीवर सुरु होणाऱ्या 'झी कॉमेडी फॅक्टरी' या नवीन कार्यक्रमाच्या निमित्ताने फराह खान, डॉक्टर संकेत भोसले, सुगंध मिश्रा, पुनीत पाठक आणि तेजस्वी प्रकाश हे कलाकार या मंचावर सज्ज झाले.

फराह खान
फराह खान
author img

By

Published : Jul 28, 2021, 1:39 PM IST

मुंबई - झी मराठीवर चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमावर तमाम प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. सुरुवातीपासूनच या कार्यक्रमाला आणि त्यातील विनोदवीरांना महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण जगाने डोक्यावर उचलून धरलं. वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील लोकं हा कार्यक्रम तितक्याच आवडीने पाहतात. या संकट काळात प्रत्येकाला आपापल्या काळज्या आणि ताणतणाव आहेत. पण काही क्षणासाठी हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवतो. मराठी कलाकारच नाही तर हिंदी कलाकारांना देखील या मंचाची ओढ आहे. म्हणूनच झी टीव्हीवर सुरु होणाऱ्या 'झी कॉमेडी फॅक्टरी' या नवीन कार्यक्रमाच्या निमित्ताने फराह खान, डॉक्टर संकेत भोसले, सुगंध मिश्रा, पुनीत पाठक आणि तेजस्वी प्रकाश हे कलाकार या मंचावर आले होते.

चला हवा येऊ द्या
चला हवा येऊ द्या

या कलाकारांच्या उपस्थितीत चला हवा येऊ द्याच्या सर्व विनोदवीरांनी कल्ला केला. त्यांचं जबरदस्त सादरीकरण पाहून या सर्व कलाकारांना हसू अनावर झालं. फराह खान चला हवा येऊ द्या च्या मंचावर पहिल्यांदाच आल्या. आणि या कार्यक्रमात येऊन कसं वाटलं याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, "मला चला हवा येऊ द्या मध्ये येऊन खूप छान वाटलं आणि भरपूर मजा आली. इकडे येऊन वेळ कसा गेला कळलंच नाही. मराठी विनोदी कलाकारांचं कॉमिक टायमिंग हे कमाल असतं. असं म्हणून मंचावरील सर्व विनोदवीरांचं फराह खान यांनी कौतुक केलं.

'झी कॉमेडी फॅक्टरी'
'झी कॉमेडी फॅक्टरी'

तेव्हा चला हवा येऊ द्या च्या मंचावर झी कॉमेडी फॅक्टरी कार्यक्रमातील कलाकारांनी केलेली धमाल पाहण्यासाठी बघायला विसरू नका 'चला हवा येऊ द्या' सोमवार ते बुधवार रात्री ९.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर

हेही वाचा - राज कुंद्राच्या कंपनीचा बिग बॉस स्पर्धकांवर होता डोळा : मॉडेल सागरिकाचा खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.