जेव्हापासून राज कुंद्राला, अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा, पोर्नोग्राफी संदर्भात अटक झाली आहे तेव्हापासून प्रामुख्याने अजून एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे अभिनेत्री गहना वशिष्ठ. गहनाने एकता कपूर निर्मित ‘गंदी बात’ या वेब सिरीजमध्ये प्रमुख भूमिका केली होती. एकता कपूरच्या अल्ट बालाजीने निर्मिती केलेली XXX ही वेब सिरीज वादग्रस्त ठरली होती. त्यातील नावाप्रमाणेच अश्लील दृश्यांमुळे आणि एका दृश्यात एक पत्नी बदफैली करताना भारतीय सेनेचा युनिफॉर्मचा वापर करताना दिसल्यामुळे वाद निर्माण झाला होता. अल्ट बालाजीचीच ‘द मॅरीड वूमन’मध्ये समलैंगिक संबंधावरील ‘हॉट’ सीन्स होते. तसेच नेटफ्लिक्सच्या ‘सेक्रेड गेम्स’ मध्येसुद्धा बरीच उत्तेजक दृश्ये होती. हे सर्व सांगण्याचा हेतू हा आहे की अनेक भारतीय आणि आंग्ल भाषेतील वेब सिरीज मध्ये ‘बोल्ड’ सीन्स मोठ्या प्रमाणात दाखविले जातात, ज्यांच्यावर कोणतीही आपत्ती दर्शविली जात नाही. वर उल्लेख केल्या गेलेल्या गहना वशिष्ठचे सुद्धा हेच म्हणणे आहे की तिने अभिनय केलेल्या ‘चित्रपटांत’ आणि या वेब सिरीजमध्ये काही वेगळं दाखविलेले नाही तरीही तिला अटक झाली होती.

आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांच्याशी वार्तालाप करताना गहना म्हणाली की, ‘माझं एवढेच म्हणणे आहे की मी केलेल्या फिल्म्समध्ये आणि अल्ट बालाजी, नेटफ्लिक्स किंवा आणि इतर प्लॅटफॉर्म्सवर दाखविल्या जाणाऱ्या वेब सिरीज मध्ये काहीही फरक नाहीये. तर मग माझ्या किंवा राज कुंद्राच्या फिल्म्स अश्लील कशा? आमच्या सर्व फिल्म्स इरॉटिका फिल्म्समध्ये मोडतात. इरॉटिक फिल्म्स आणि पोर्नोग्राफिक फिल्म्समध्ये वेगळेपण आहे. मी कधीही पॉर्न फिल्म केलेली नाही आणि करणारही नाही.’ ती पुढे असंही म्हणाली की माझ्या बोलण्याचा अर्थ हा नव्हे की मला अटक झाली म्हणून त्या सर्वांनाही व्हावी.
गहना वशिष्ठचे खरे नाव आहे वंदना तिवारी. भोपाळ मध्ये जन्मलेल्या या देखण्या तरुणीला मनोरंजनसृष्टीचे आकर्षण नेहमीच होते. तिच्याकडे कॉम्प्युटर इंजिनियरिंगची पदवी आहे. तसेच तिने न्युज अँकर म्हणूनही काम केलंय. अभिनयाची आवड जोपासण्यासाठी तिने भोपाळमध्ये नाटकांतून कामे केली आहेत. परंतु मुंबई नगरी तिला खुणावत होती आणि तिने मनोरंजनसृष्टीत आपले नशीब आजमावण्यासाठी या मायानगरीत पाऊल ठेवले. तिने सांगितले की तिला फार स्ट्रगल करावे लागले नाही. गहनाने २०१२ साली ‘मिस आशिया बिकिनी’ चा किताब पटकावला होता. गहनाने जवळपास २७ दाक्षिणात्य चित्रपटांतून काम केलंय आणि सुरुवातीला तिने हिंदी टेलिव्हिजन सिरियल्समध्येही भूमिका केल्या आहेत.

राज कुंद्रा प्रकरणात शिल्पा शेट्टी व्यतिरिक्त त्याच्या समर्थनात कोणी बोलत असेल तर ती आहे गहना. तिला ते निदर्शनास आणून दिल्यावर ती गोड हसली. आज तिने इंस्टाग्राम लाईन सेशन केले आणि आपल्या चाहत्यांशी गप्पा मारल्या. ‘मी आज लाईव्ह आले आहे आणि मी काहीही घातलेले नाही. तुम्हाला हे व्हल्गर वाटतेय का? नाही ना? मग जर मी कपडे न घालता तुमच्यासमोर येऊनही तुम्हाला असभ्य वाटत नाहीये तर ज्या चित्रपटांत मी कपडे घालून आहे ते पोलिसांना अश्लील का वाटतेय?’
आमच्या प्रतिनिधींशी बोलताना गहनाने हेच सांगितले की, ‘मी अभिनय केले ‘ते’ चित्रपट इरॉटिका सदरात मोडतात, आणि ते कदापी पॉर्न नाहीयेत. इरॉटिकामध्ये भलेही थोड्याफार प्रमाणात नग्नता असेल परंतु पॉर्नमध्ये गुप्तांगे उघडपणे दाखविले जातात. कोणीही मला दाखवून द्यावे की मी कुठल्याही चित्रपटात माझे गुप्तांग उघडपणे दर्शविले आहे.’
‘फ्रंटल न्यूडिटी आणि एक्स्पोसिंग प्रायव्हेट पार्टस आर टू डिफरंट थिंग्स’, पॉर्न आणि इरॉटिकामध्ये हा फरक आहे. ‘पुढे काय करणार? या इंडरस्त्रीत राहणार की सोडून निघून जाणार?’ या कीर्तिकुमार यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गहना म्हणाली, ‘मी ही इंडस्ट्री सोडून कधीच जाणार नाही. जीना यहाँ मरना यहाँ. मला मनोरंजनसृष्टी एव्हडी आवडते की मी शेवटचा श्वासही फिल्म सेट वर घ्यावा असे मला वाटते.’