ETV Bharat / sitara

चैतन्यमयी टायगर श्रॉफच्या चपळता आणि फिटनेसचे रहस्य! - टायगर श्रॉफचे मार्शल आर्ट्स

टायगर श्रॉफ लहान असल्यापासून मार्शल आर्ट्स आणि जिम्नॅस्टिकमध्ये प्रशिक्षण घेत होता. त्याशिवाय तो नेहमी नृत्याच्या तंत्राच्या विविध प्रकारांचा सराव करीत असतो. तो एक उत्साही फुटबॉल खेळाडू आहे आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा तो विविध खेळ खेळत राहतो.

Tiger Shroff's agility a
टायगर श्रॉफची चपळता
author img

By

Published : Apr 2, 2021, 2:00 PM IST

टायगर श्रॉफचे नाव आले की चपळता आणि अप्रतिम शरीरसौष्ठव हे शब्द बरोबर येतातच. तो एक तरुण सुपरस्टार आहे ज्याचे सर्वाधिक तरुण आणि लहान मुलं फॅन्स आहेत. बरीच मुले मोठेपणी टायगर श्रॉफ बनण्याचे स्वप्न बाळगून असतात. त्याच्या ‘चार्म’ला तोड नाही असे त्याचे फॅन्स सांगत असतात. अत्यंत फिट बॉडी असलेल्या टायगर श्रॉफने आपल्या चित्रपटांतून खतरनाक ऍक्शन सीन्स लीलया केले. त्याचे ऍक्शन सीन्स त्याच्या फिमेल फॅन्सना वेड लावून जातात. त्याचे नृत्यकौशल्यही वाखाणण्याजोगे आहे. महत्वाचं म्हणजे हे सर्व रातोरात घडलेलं नाहीये. हे प्राविण्य मिळविण्यासाठी टायगरने अपरंपार कष्ट घेतलेले आहेत हे विसरून चालणार नाही. वर्षानुवर्षे समर्पण आणि मेहनतीमुळे तसेच मार्शल आर्टस् शिकून टायगरने ही बॉडी आणि नृत्य कौशल्य कमावले आहे.

Tiger Shroff's agility
श्रॉफच्या चपळता आणि फिटनेसचे रहस्य
टायगर लहान असल्यापासून मार्शल आर्ट्स आणि जिम्नॅस्टिकमध्ये प्रशिक्षण घेत होता. त्याशिवाय तो नेहमी नृत्याच्या तंत्राच्या विविध प्रकारांचा सराव करीत असतो. तो एक उत्साही फुटबॉल खेळाडू आहे आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा तो विविध खेळ खेळत राहतो. टायगरच्या फिटनेस सिस्टीमबद्दल बोलताना, त्याचा ट्रेनर म्हणाला, "शास्त्रीय वजन प्रशिक्षण पद्धतीवर आम्हा दोघांचा विश्वास आहे आणि आम्ही ते कटाक्षाने पाळतो. टायगरला मैदानी खेळ आवडतात म्हणून मी त्याच्या वर्कआउट्ससाठी जिम आणि मैदानी खेळांचं मिश्रण असणारे फिटनेस शेड्युल आखलं आहे. त्यामुळे फिटनेस सोबतच त्याची चपळता देखील वाढते.’
Tiger Shroff's agility
श्रॉफच्या चपळता आणि फिटनेसचे रहस्य
हेही वाचा - एव्हरग्रीन रेखा ने नेहा कक्कर ची भरली ‘ओटी’!जेव्हा टायगर चित्रपटांतून कामं करीत नव्हता तेव्हापासूनच तो समुद्रकिनाऱ्यावर जिम्नॅस्टिकची प्रॅक्टिस करायचा, तसेच मार्शल आर्टस् ची सुद्धा. त्याने केलेली मेहनत आता कामी येतेय. महत्वाचं म्हणजे आता इतका मोठा स्टार झाल्यावरही शूटिंगच्या बिझी शेड्युलमधून तो फिटनेससाठी वेळ काढतोच काढतो.
Tiger Shroff's agility
श्रॉफच्या चपळता आणि फिटनेसचे रहस्य
हा ‘हॉट बॉडी’ वाला तरुण सुपरस्टार टायगर श्रॉफ बऱ्याच ऍक्शन फिल्म्स मधून दिसणार आहे. सध्या तो हिरोपंती २, बागी ४ आणि गणपत यासारख्या हाय ड्रामा अ‍ॅक्शन चित्रपटांवर काम करत आहे. अशा उच्च गुणवत्तेची आणि क्षमतेची ऍक्शन करताना त्या चित्रपटांना न्याय देण्यासाठी टायगर श्रॉफ कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही हे जाणून आहे.

हेही वाचा - ४ दिवसांतच गेल्या पर्वातल्या ‘कोण होणार करोडपती' च्या प्रवेशांचा उच्चांक मोडला गेलाय!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.