ETV Bharat / sitara

COVID 19 - दैनंदिन मजुरांच्या मदतीसाठी समोर आली एकता कपूर, घेतला 'हा' निर्णय - Ekta kapoor latest news

लॉक डाऊनमुळे चित्रपट, मालिका सर्व कार्यक्रमाचे शूटिंग रद्द आहे. त्यामुळे यामध्ये काम करणारे हजारो मजूर बेरोजगार झाले आहेत.

ekta kapoekta kapoor decide to help daily wages worker or
COVID 19 - दैनंदिन मजुरांच्या मदतीसाठी समोर आली एकता कपूर, घेतला 'हा' निर्णय
author img

By

Published : Apr 4, 2020, 9:51 AM IST

मुंबई - कोरोना व्हायरसने आज संपूर्ण देशात दहशत माजवली आहे. अशा कठीण परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकां पासून तर कलाकारांपर्यंत बरेच जण मदतीचा हात घेऊन पुढे सरसावले आहेत. ज्याला जेवढं शक्य होईल ते तेवढी मदत पी एम आणि सी एम रिलीफ फंड मध्ये जमा करत आहेत. आता प्रसिद्ध निर्माती आणि दिग्दर्शिका एकता कपूर देखील मदत करण्यासाठी पुढे आली आहे.

एकताने एक मोठा निर्णय घेतला आहे. यंदा ती कोणतेही मानधन स्वतः साठी घेणार नाही. जेणेकरून कंपनीचे आर्थिक ओझे कमी होईल. तसेच, मजुरांनाही यातून मदत होईल, असे तिने ट्विट करून सांगितले आहे.

शुक्रवारी एका ट्विटमध्ये तिने लिहिलं की 'ही माझी पहिली आणि मुख्य जबाबदारी आहे, की मी त्या मजुरांची मदत करावी जे बालाजी टेलीफिल्म साठी काम करतात. शूटिंग थांबल्यामुळे त्यांचे बरेच आर्थिक नुकसान झालं आहे. त्यामुळे बालाजी टेलीफिल्म्स मधील मी यंदाचे मानधन घेणार नाही. जे 2.5 कोटी इतके आहे'.लॉक डाऊन मुळे चित्रपट, मालिका सर्व कार्यक्रमाचे शूटिंग रद्द आहे. त्यामुळे यामध्ये काम करणारे हजारो मजूर बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट आले आहे. त्यांच्या मदतीसाठी आत्तापर्यंत सलमान खान, शाहरुख खान, अजय देवगन आणि रोहित शेट्टी हे सेलिब्रिटी पुढे आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.