ETV Bharat / sitara

ईडीने तीन आघाडीच्या बॉलिवूड फॅशन डिझायनर्सना धाडली नोटीस - फॅशन डिझायनर्सची ईडी करणार चौकशी

आमदाराशी संबंधीत असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देशातील तीन आघाडीच्या फॅशन डिझायनर्सना बोलावले आहे. संबंधीत डिझाइनरांची नावे उघड करण्यात आलेली नाहीत कारण ते प्रतिक्रिया देण्यासाठी उपलब्ध नाहीत.

ED issues notices
बॉलिवूड फॅशन डिझायनर्सना धाडली नोटीस
author img

By

Published : Jun 23, 2021, 9:22 PM IST

नवी दिल्ली: पंजाबमधील कॉंग्रेसच्या एका आमदाराशी संबंधीत असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देशातील तीन आघाडीच्या फॅशन डिझायनर्सना बोलावले आहे.

अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, डिझायनर्सना पुढील आठवड्यात चौकशीसाठी दिल्लीच्या केंद्रीय चौकशी एजन्सीसमोर हजर राहाण्यासाठी नोटिसा पाठविल्या आहेत. संबंधीत डिझाइनरांची नावे उघड करण्यात आलेली नाहीत कारण ते प्रतिक्रिया देण्यासाठी उपलब्ध नाहीत.

सूत्रांनी सांगितले की, ही बाब पंजाबचे कॉंग्रेसचे आमदार सुखपालसिंग खैरा आणि त्यांच्या कुटुंबाशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणाशी संबंधित आहे आणि यासंदर्भात डिझाइनर्सना चौकशीसाठी बोलावले आहे. एजन्सीने मार्चमध्ये आरोपींविरोधात छापा टाकला होता.

छापा टाकण्याच्या वेळी खैरा आम आदमी पक्षाचे बंडखोर आमदार होते. नुकताच त्यांनी पुन्हा कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

खैरा यांनी पंजाबच्या कपूरथला जिल्ह्यातील भोलाथ मतदारसंघातून २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या तिकिटावर विजय मिळविला होता. तथापि, जानेवारी २०१९ मध्ये त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिला आणि पंजाब एकता पक्ष नावाचा स्वतःचा पक्ष सुरू केला होता.

ईडीने खैरा यांच्यावर मादक पदार्थांच्या प्रकरणातील दोषी आणि बनावट पासपोर्ट रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांचा 'साथीदार' असल्याचा आरोप केला आहे.

५६ वर्षांच्या खैरा यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत आणि ते म्हणाले की केंद्राकडून तीन नवीन कृषी कायद्यांना विरोध केल्यामुळे केंद्रीय संस्था त्यांना लक्ष्य करीत आहेत.

२०१५ च्या फाजिल्का (पंजाब) च्या अंमली पदार्थांच्या प्रकरणाशी संबंधित हा खटला आहे, ज्यात सुरक्षा एजन्सींना आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या गटाकडून १८०० ग्रॅम हेरॉईन, २४ सोन्याचे बिस्किट, दोन हत्यारे, २६ काडतुसे आणि दोन पाकिस्तानी सिम कार्ड जप्त करण्यात आले आहेत.

सूत्रांनी सांगितले की ईडीला हे समजले आहे की रोख रकमेसह काही देयके तीन डिझाइनर्सना देण्यात आल्या आहेत आणि म्हणूनच एजन्सीला त्या व्यवहाराबद्दल त्यांचे मत जाणून घ्यायचे होते आणि त्यांचे जवाब नोंदवायचे आहेत. ईडीने पंजाब पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे खैरा व इतरांवर मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा - 'तारक मेहता'ची 'दयाबेन' आमिर खान, ऐश्वर्यासोबतही झळकली आहे मोठ्या पडद्यावरया एजन्सीने आरोप केला आहे की, "हे अंमली पदार्थ भारत-पाकिस्तान सीमेवरुन तस्करी करण्यात आले होते आणि टोळीतील एक नेता ब्रिटनमध्ये आहे. खैरा आंतरराष्ट्रीय तस्करांच्या टोळीस सक्रियपणे मदत करत होता आणि गुन्ह्यातून मिळालेल्या नफ्याचा आनंद घेत होता.''

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.