मुंबई - बॉलिवूडचा अॅक्शन हिरो टायगर श्रॉफचा आज वाढदिवस आहे. सध्या तो त्याच्या आगामी 'बागी ३' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. आज त्याचा ३० वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियवर चाहत्यांसह कलाविश्वातील कलाकारांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याची कथीत गर्लफ्रेंड अभिनेत्री दिशा पाटणीनेही त्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचासोबतचा एक डान्स व्हिडिओ तिने शेअर केला आहे.
दिशाने टायगरसोबत 'बँग बँग' चित्रपटातील गाण्यावर डान्स केला होता. त्यांचा हा व्हिडिओ जुना आहे. मात्र, या व्हिडिओत त्यांच्या डान्सची दमदार केमेस्ट्री दिसून येते. दिशाने हा व्हिडिओ शेअर करुन टायगरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा -दमदार अॅक्शनसह 'सूर्यवंशी', 'सिंबा' आणि 'सिंघम'ची धमाकेदार एन्ट्री, पाहा ट्रेलर
-
Happy b’day @iTIGERSHROFF pic.twitter.com/bpskldKnbp
— Disha Patani (@DishPatani) March 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Happy b’day @iTIGERSHROFF pic.twitter.com/bpskldKnbp
— Disha Patani (@DishPatani) March 2, 2020Happy b’day @iTIGERSHROFF pic.twitter.com/bpskldKnbp
— Disha Patani (@DishPatani) March 2, 2020
लवकरच टायगर आणि दिशा 'बागी ३'च्या एका गाण्यात डान्स करताना दिसणार आहेत. 'डू यू लव्ह मी' हे गाणे काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाले. या गाण्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती.
हेही वाचा -जगभरातील टक्कल असणाऱ्यांसाठी अनुपम खेर यांचा खास व्हिडिओ