ETV Bharat / sitara

दिशाने सुरू केले स्वतःचे यूट्यूब चॅनल, शेअर केला पहिला व्हिडिओ - tiger shroofs girlfriend disha

दिशा पटानीने स्वतःचा यूट्यूब चॅनेल सुरु केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन तिनं याबद्दलची माहिती दिली आहे. याला दिलेल्या कॅप्शनमध्ये दिशा म्हणाली, तुम्हा सर्वांसोबत माझा पहिला यूट्यूब व्हिडिओ शेअर करण्यासाठी वाट पाहावत नाहीये

दिशाने सुरु केला यूट्यूब चॅनल
author img

By

Published : Sep 14, 2019, 11:35 AM IST

मुंबई - बॉलिवूड कलाकारांमध्ये सध्या आपलं स्वतःच यूट्यूब चॅनल सुरू करण्याची क्रेझ आहे. आलिया भट्ट आणि जॅकलीन फर्नांडीसपाठोपाठ आता दिशा पटानीनेही स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरू केले आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन तिनं याबद्दलची माहिती दिली आहे.

याला दिलेल्या कॅप्शनमध्ये दिशा म्हणाली, तुम्हा सर्वांसोबत माझा पहिला यूट्यूब व्हिडिओ शेअर करण्यासाठी वाट पाहावत नाहीये. तुम्हा सगळ्यांना हा व्हिडिओ आवडेल, अशी आशा करते. या व्हिडिओमध्ये दिशाच्या दिवसाची सुरुवात आणि दिवसभराचं संपूर्ण शेड्यूल पाहायला मिळत आहे.

  • Can’t wait to share my first YouTube video with all of you. I hope you all enjoy watching it as much as I did filming it. Have tried shooting it as candid, raw and personal. Amateur at it but showcasing my real self to all of you❤️ pic.twitter.com/hjFswddyih

    — Disha Patani (@DishPatani) September 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तिच्या जिम सेशनपासून डान्स क्लास, मेकअप आणि शोमध्ये हजेरी लावण्यापर्यंतची कामे या ३ मिनीट ३७ सेकंदांच्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास काही दिवसांपूर्वीच दिशा भारत सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यानंतर आता ती मलंग सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र असून यात आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर आणि कुणाल खेमू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. मोहित सुरी या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.