ETV Bharat / sitara

'एक व्हिलन २' चित्रपटासाठी दिशा पाटनी करतेय तयारी - 'एक व्हिलन २' मध्ये दिशा पाटनी

२०२० च्या थ्रिलर फिल्म 'मलंग' मध्ये अखेरची भूमिका साकारलेली बॉलिवूड स्टार दिशा पाटनीने आता तिच्या आगामी 'एक व्हिलन २' या चित्रपटाची तयारी सुरू केली आहे.

Disha Patani
'एक व्हिलन २'
author img

By

Published : Jan 30, 2021, 6:53 PM IST

मुंबई - २०२० च्या थ्रिलर फिल्म 'मलंग' मध्या बॉलिवूड स्टार दिशा पाटनीला आपण अखेरचे पाहिले होते. कोरोना संकटानंतर अनेक कलाकार मोठ्या पडद्यापासून दूर गेले होते. त्यात दिशाही होती. आता तिने आपल्या आगामी 'एक व्हिलन २' चित्रपटाची तयारी सुरू केली आहे.

'बागी' स्टार दिशा पाटनीच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, "दिशा बरीच वर्कशॉप्स घेत आहे आणि चित्रपटासाठी संपूर्ण तयारीमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटासाठी ती बरीच वाचन सत्रेही करत आहे, तिने या कामाला प्राधान्य दिले आहे. ती लवकरच या 'एक व्हिलन २' च्या शुटिंगला सुरुवात करेल. "

'एक व्हिलन २' साठी अभिनेत्री दिशा पाटनी पुन्हा एकदा 'मलंग' दिग्दर्शक मोहित सूरीबरोबर एकत्र येणार आहे. ''एक व्हिलन २' व्यतिरिक्त सलमान खानसोबत 'राधेः युवर मोस्ट वॉन्टेड भाई' मध्येही पाटनी दिसणार आहे. प्रभू देवा दिग्दर्शित या चित्रपटात रणदीप हूडा आणि जॅकी श्रॉफ देखील आहेत.

हेही वाचा - 'बच्चन पांडे'मध्ये अक्षयच्या विरोधात खलनायक साकारणार अभिमन्यू सिंह!!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.