ETV Bharat / sitara

दिशा पटानीने हॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीपासून 'मलंग'साठी घेतली प्रेरणा

author img

By

Published : Jan 27, 2020, 5:32 PM IST

अभिनेत्री दिशा पटानी 'मलंग' चित्रपटात पहिल्यांदाच ग्रे कॅरॅक्टर साकारणार आहे. यासाठी तिने हॉलिवूडच्या प्रसिध्द अभिनेत्रीपासून प्रेरणा घतल्याचे सांगितले.

Disha Patani
दिशा पटानी

मुंबई - बॉलिवूडची मल्टी टॅलेन्टेड अभिनेत्री दिशा पटानी पहिल्यांदाच ग्रे शेड असलेली भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी तिला खास मेहनत घ्यावी लागणार होती. अशा वेळी तिला प्रेरणा मिळाली हॉलिवूड अभिनेत्री एंजेलिना जोलीपासून, हा खुलासा तिने केला आहे.

अलिकडेच 'मलंग' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. याचे सर्वत्र कौतुक होत आहे. यामध्ये दिशा आणि आदित्य रॉय कपूर यांची ऑन स्क्रीन केमेस्ट्री पाहायला मिळत आहे.

मोहित सुरू यांनी बनवलेल्या या सिनेमाबद्दल बोलताना दिशा म्हणाली, ''हा फार मजेशीर रोल होता आणि नरेशन नंतर ५ मिनिटातच मी होकार देऊन टाकला. कारण खूप कमी मुलींना ग्रे कॅरेक्टर साकारायला मिळतंय आणि ही संधी मला सोडायची नव्हती. मला या भूमिकेची ऑफर मिळाल्यानंतर मी लगेच स्वीकरली. मला खलनायक आवडतात आणि अशी भूमिका करायला मला आवडते.''

दिशा पुढे म्हणाली, ''याबाबतीत एंजेलिना जोली माझी फेवरेट आहे. मी तिच्यापासून शिकते. ती ग्रे शेड साकारण्यामध्ये जगात सर्वोत्तम आहे. ती जगातील सर्वात सुंदर खलनायिका आहे. मी तिच्या काही सिनेमातून प्रेरणा घेतली.''

'मलंग' सिनेमात दिशा आणि आदित्य रॉय कपूर यांची ऑन स्क्रिन केमेस्ट्री पाहायला मिळणार आहे. ७ फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज होत आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.