मुंबई - ज्येष्ठअभिनेत्री डिंपल कपाडीया यांचा भाचा करण कपाडीया लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आगामी 'ब्लँक' चित्रपटात तो मुख्य भूमिकेत झळकेल. या चित्रपटाचे पोस्टर अलिकडेच रिलीज करण्यात आले आहे.
'ब्लँक' चित्रपटात करणसोबत सनी देओलदेखील झळकणार आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाचे पोस्टर त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे.
Blank poster for #Blank... Yes, you read it right... #Blank stars newcomer Karan Kapadia [Dimple Kapadia's nephew] with Sunny Deol in a pivotal role... Directed by Behzad Khambata... 3 May 2019 release. pic.twitter.com/mbJY7pZVUQ
— taran adarsh (@taran_adarsh) March 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Blank poster for #Blank... Yes, you read it right... #Blank stars newcomer Karan Kapadia [Dimple Kapadia's nephew] with Sunny Deol in a pivotal role... Directed by Behzad Khambata... 3 May 2019 release. pic.twitter.com/mbJY7pZVUQ
— taran adarsh (@taran_adarsh) March 28, 2019Blank poster for #Blank... Yes, you read it right... #Blank stars newcomer Karan Kapadia [Dimple Kapadia's nephew] with Sunny Deol in a pivotal role... Directed by Behzad Khambata... 3 May 2019 release. pic.twitter.com/mbJY7pZVUQ
— taran adarsh (@taran_adarsh) March 28, 2019
चित्रपटाचे पोस्टरही नावाप्रमाणेच कोरे ठेवण्यात आले आहे. बॉलिवूडच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाची कथा काय आहे, यामध्ये आणखी कोणते कलाकार झळकणार आहेत, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, यामध्ये इशिता दत्ताचीही वर्णी लागली आहे.
'ब्लँक' चित्रपटाचे दिग्दर्शन बेहजाद खंबाटा हे करत आहेत. तर, निर्मिती डॉ. श्रीकांत भासी, निशांत पिट्टी, टोनी डिसुजा आणि विशाल राणा हे करत आहेत. ३ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.