ETV Bharat / sitara

मधुबालावर प्रेम, पण २२ वर्षांनी लहान सायरा बानोंशी निकाह, अशी आहे LOVE STORY - दिलीप कुमार निधन

लहानपणीच सायराने दिलीप कुमार यांच्याशी लग्न करण्याचे ठरवले होते. १९६६ मध्ये त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्या नंतर गरोदरही होत्या. मात्र, जन्माआधीच मुलाचे निधन झाले. त्यामुळे त्यांनी मूल होऊ दिले नाही.

dilip kumar - saira bano love story
dilip kumar - saira bano love story
author img

By

Published : Jul 7, 2021, 9:13 AM IST

Updated : Jul 7, 2021, 2:42 PM IST

मुंबई - पन्नास ते साठच्या दशकात दिलीप कुमार हे मुलींसाठी चॉकलेट हिरो होते. लाखो मुली त्यांच्यासाठी वेड्या होत्या. सायरा बानो त्यांच्यापेक्षा २२ वर्षांनी छोटी आहे. पण म्हणतात ना 'प्रेमाला वयाचे बंधन नसते'. १२ व्या वर्षीच सायरा बानो दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडल्या होत्या. त्या दोघांनी लग्न केले, तेव्हा दिलीप कुमार ४४ वर्षांचे तर सायरा बानो २२ वर्षांच्या होत्या. सायरा बानो यांनी दिलीप कुमारला त्यांच्या सुख दु:खात साथ दिली.

लव्ह स्टोरी
लव्ह स्टोरी

लहानपणीच त्यांनी दिलीप कुमार यांच्याशी लग्न करण्याचे ठरवले होते. १९६६ मध्ये त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्या नंतर गरोदरही होत्या. मात्र, जन्माआधीच बाळ दगावले. त्यानंतर त्यांनी मुल न होऊ दिले नाही. त्यांनी आपल्या आत्मचरित्रात सायरा बानोबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे. ''सायरा ही माझ्यापेक्षा २२ वर्षांनी लहान होती. तेव्हा मी अनेक वेळेस माझे केस पांढरे होत आहेत, असे म्हटले होते. तरीही ती मागे हटली नाही. तिचे माझ्यावरील प्रेम तसूभरही कमी झाले नाही. माझ्यासाठी ती फारसी आणि उर्दू या भाषाही शिकल्याचेही'' त्यांनी नमूद केले आहे.

या कारणामुळे मधुबालाशी केले नाही लग्न

दिलीप कुमार यांना मधुबालाशी लग्न करण्याची इच्छा होती. दिलीप कुमार 'द सबस्टन्स अँड शॅडो' या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी हा अनुभव सांगितला आहे. 'नया दौर' या चित्रपटाच्या आधीपासून त्यांच्यात प्रेम बहरले. त्या दोघांना लग्न करायचे होते. मात्र, मधुबालाच्या वडिलांना हे नाते मान्य नव्हते. या चित्रपटाच्या वेळेस त्या दोघांमध्ये बोलणे बंद झाले होते. मात्र, दोघांमधील वादाचा त्यांनी कामावर परिणाम कधीच होऊ दिला नाही.

हेही वाचा - 'ट्रॅजेडी किंग' दिलीप कुमार यांच्या निधनानंतर दिग्गजांच्या प्रतिक्रिया..

Last Updated : Jul 7, 2021, 2:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.