मुंबई - जगभरात सध्या कोरोना विषाणूने दहशत पसरवली आहे. भारतातही या विषाणूने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत कोरोनापासून बचावाचे संदेश देण्यासाठी सेलेब्रिटी सोशल मीडियाचा आधार घेत सुरक्षा बाळगण्याचा सल्ला देत आहेत.
रामदास आठवलेंच्या 'कोरोना गो' या कवितेनंतर काहींनी गाणी देखील तयार केली आहेत. आपल्या गाण्याच्या माध्यमातून हे कलाकार जनजागृती करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर अतरंगी गाण्यासाठी प्रसिद्ध असलेली ढिंचॅक पूजाही यामध्ये मागे नाही. तिनेही कोरोनावर गाणे तयार करून नागरिकांना कोरोनापासून कसा बचाव करावा, हे सांगितले आहे.
हेही वाचा -कोरोना इफेक्ट : बंदी घातलेल्या देशातील लोक दुसऱ्या देशांच्या मार्गे महाराष्ट्रात येतायेत
हे गाणे केवळ जनजागृतीसाठी असल्याचे तिने या व्हिडिओत म्हटले आहे. या व्हिडिओवर आत्तापर्यंत बरेच व्हिव्ज मिळाले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त म्हणजे ४५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याखालोखाल केरळ, उत्तरप्रदेश आणि कर्नाटकात अनुक्रमे २७, १७ आणि १४ जणांना लागण झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये १२ तर लडाख केंद्रशासित प्रदेशात ८ जणांना बाधा झाली आहे. इतर राज्यातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. सर्वांवर उपचार सुरू आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. तर अनेक देशांतून भारतात येण्याजाण्यास बंदी घालण्यात आली आहे.