फार्म हाऊसवर गुरे चरायला घेऊन गेले धर्मेंद्र, व्हिडिओ चर्चेत - गुरे चारताना धर्मेंद्र
धर्मेंद्र यांनी शेअर केलेला व्हिडिओ सध्या बराच चर्चेत आहे. यात ते आपल्या फार्म हाऊसवरील गुरांना चरायला घेऊन गेलेले दिसतात. या मुक्या प्राण्यांकडून खूप प्रेम मिळते असेही त्यांनी म्हटलंय.

मुंबई - बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्रने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक फार्महाऊसवरील व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये धर्मेंद्र आपल्या फार्महाऊसमध्ये गाडी चालवताना दिसत आहेत. यात ते आपल्या गाई म्हशींना शेतात चारत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना खूप आवडलाय.
हा व्हिडिओ सामायिक करताना धर्मेंद्रने लिहिले आहे, ' दोस्तांना प्रेमच प्रेम मिळते या मुक्या मित्रांसोबत. चांगल्या गवताची मेजवानी आहे. जिथे गवत दिसते तिकडे घेऊन जातो आपल्या या साथिदारांना" अशा प्रकारे धर्मेंद्र यांनी आपले गुरांवरचे प्रेम व्यक्त केलंय.
-
Dosto, pyaar hi pyaar milta hai be-zabaan in saathiyon se.... achhi ghaas daawat hai ... jahan dikh jaye wahin le jaata hoon apne in saathiyon ko .... pic.twitter.com/6pF8HbR1f5
— Dharmendra Deol (@aapkadharam) November 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Dosto, pyaar hi pyaar milta hai be-zabaan in saathiyon se.... achhi ghaas daawat hai ... jahan dikh jaye wahin le jaata hoon apne in saathiyon ko .... pic.twitter.com/6pF8HbR1f5
— Dharmendra Deol (@aapkadharam) November 16, 2020Dosto, pyaar hi pyaar milta hai be-zabaan in saathiyon se.... achhi ghaas daawat hai ... jahan dikh jaye wahin le jaata hoon apne in saathiyon ko .... pic.twitter.com/6pF8HbR1f5
— Dharmendra Deol (@aapkadharam) November 16, 2020
हेही वाचा - आदित्य रॉय कपूरला शर्टलेस फोटोसह वाढदिवशी मिळाले मोठे गिफ्ट
धर्मेंद्र व्हिडिओमध्ये सांगत आहेत की, मी गाई म्हशींना चारत आहे. त्याबरोबरच ते चाहत्यांना दिवळी कशी गेली हेही विचारताना दिसतात. या फार्म हाऊसचे अनेक व्हिडिओ ते पोस्ट करीत असतात. आपला वेळ या ठिकाणी असलेल्या शेतीमध्ये घालवताना दिसतात. इथे पिकलेल्या भाजीपाल्याचे, फळांचे व्हिडिओही ते शेअर करतात.
हेही वाचा - सौमित्र चटर्जी... बंगाली चित्रपट सृष्टीतील एका युगाचा अंत