मुंबई - गेल्या वर्षीपासून कोरोना संकट आपल्याला सतावत आहे. त्यावर नियंत्रण मिळवत असताना कोरोनाने आता दुपट्ट ताकदीने भारतावर हल्ला केला आहे. वैद्यकीय सेवांवरील ताण वाढला असून लोकांच्या मानसिक स्वास्थ्यावरदेखील परिणाम होताना दिसतोय. करण जोहरने गेल्या वर्षी कोरोना संक्रमण काळात अनेकांची मदत केली होती आणि आता तो आपली निर्मितीसंस्था धर्मा प्रॉडक्शनच्या सोशल मीडियाचे पेज सामाजिक कल्याणासाठी वापरणार आहे. धर्मा प्रोडक्शन्सची सोशल मीडिया पेजेस आता कोविड-१९ संबंधित लसीकरण प्रक्रिया आणि मानसिक आरोग्याविषयी माहितीसाठी वापरली जातील.
सोशल मीडियाचा वापर करणार समाज कल्याणासाठी या प्राणघातक विषाणूचा प्रादुर्भाव देशाला पोखरत असल्यामुळे धर्मा प्रॉडक्शन्सने ‘युवा’ च्या, ज्यावर तरुणाई आणि त्यांच्याकडून अर्थपूर्ण संभाषणे ठेवण्यासाठी एक सुरक्षित जागा आहे, साथीने संसाधने आणि सत्यापित माहितीचा फायदा घेऊन या लोकांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करत आपल्या सामाजिक व्यासपीठाचा विस्तार केला आहे. हे एक विश्वासावनीयरित्या उचललेले पाऊल असून त्यामुळे अनेकांना फायदा होईल असे ‘धर्मा’ ला वाटते. भारतात लसीकरण प्रक्रियेबद्दल आपल्याकडे काही प्रश्न, शंका किंवा मदत असल्यास किंवा मानसिक आरोग्य समस्या असल्यास आणि त्यासाठी मदत हवी असेल तर ते पूर्ण करण्यासाठी टीम युवा आणि धर्मा प्रयत्न करेल असे ते म्हणतात.
‘या कठीण समयी ‘धर्मा’ मधील आम्ही सर्व देशवासीयांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहोत. आपण सर्वांनी एकत्रितपणे याचा मुकाबला करूया तोवर घरीच राहा आणि सुरक्षित राहा. कोणत्याही तात्काळ मदतीची आवश्यकता असल्यास, कृपया कोणत्याही व्यासपीठावरुन तरूणांशी संपर्क साधा कारण ते यासाठी वेगवान कार्य करीत आहेत. अधिक माहितीसाठी @धर्मामुव्हीज शी संपर्क करा’ असे आवाहन त्यांनी केले आहे.