ETV Bharat / sitara

धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सीने निवडले पहिले दोन कलाकार! - धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सी (डीसीए)

करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेनंतर करण जोहरने आता टॅलेंट शोधणारी नवी संस्था स्थापन केली आहे. धर्मा कॉर्नरस्टोन असे नाव असलेल्या या एजन्सीने दोन गुणी कलाकार बॉलिवूडसाठी शोधले आहेत.

धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सी
author img

By

Published : Feb 19, 2021, 4:33 PM IST

मुंबई - निर्माता, दिग्दर्शन आणि बरेच काही करणारा करण जोहरने अजून एक व्यवसाय सुरु केला असून त्यातून चित्रपटसृष्टीला नवीन टॅलेंटेड कलाकार देण्यात येणार आहेत. धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सी या नवीन कंपनी मार्फत ‘बुलबुल’ चित्रपटातील हिरॉईन तृप्ती डिमरीची पहिली निवड करण्यात आली आहे. ‘बुलबुल’ हा चित्रपट अभिनेत्री व निर्माती अनुष्का शर्माने तिच्या ‘क्लीन स्लेट फिल्म्स’च्या बॅनरखाली बनविला होता व तृप्ती डिमरीच्या अभिनयाची भरपूर तारीफ झाली होती. मिस डिमरीने पोस्टर बॉईझ मधून बॉलिवूड पदार्पण केलं होतं, जो मराठमोळ्या श्रेयस तळपदेने दिग्दर्शित केला होता आणि तो मराठी पोश्टर बॉईझचा रिमेक होता. तिच्या सुंदरपणाची फिल्मी वर्तुळात चर्चा आहे.

धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सीने निवडले पहिले दोन कलाकार!
धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सी (डीसीए) ने निवडलेला दुसरा कलाकार म्हणजे गुरफतेह पीरजादा. हँडसम आणि कडक पर्सनॅलिटी असलेला गुरफतेह करण जोहर निर्मित दिवंगत सुशांत सिंग राजपूत व जॅकलिन फ़र्नांडीझ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘गिल्टी’ चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत होता. तो ‘डीसीए स्क्वाड’ मध्ये एंट्री मिळाल्यामुळे अत्यानंदित आहे. डीसीए अशा गुणी कलाकारांना भक्कम पाठिंबा देत त्यांना चित्रपटसृष्टीत जम बसविण्यासाठी मदत करणार आहे.

‘डीसीए स्क्वाड’ अजून काहीं नावांची घोषणा अपेक्षित आहे.

हेही वाचा - रणवीर सिंगच्या 'सर्कस'मध्ये झळकणार दीपिका पदुकोण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.