ETV Bharat / sitara

अभिनय क्षेत्रातील व्यक्ती का करतात आत्महत्या ?

author img

By

Published : Aug 9, 2020, 3:17 PM IST

बहुतेकदा आत्महत्येमागे नैराश्य हे मुख्य कारण मानले जाते. कुठून आणि का येते हे नैराश्य? पोटभर जेवणारे आणि सगळ्या सोयी सुविधा आयुष्यात असणारेच नेमके नैराश्याने ग्रासलेले का असतात? ज्यांना आज कसे जगायचे आणि उद्या आपले काय होणार हे देखील माहित नसणारे गरीब भुके कंगाल, आपला आणि कुटुंबाचा जीव मुठीत धरून शेकडो मैल पायपीट करणारे जीव कधीच नैराश्याने जीवन संपवताना का दिसत नाहीत? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य माणूस म्हणून आपल्याला पडतात.

Artist
कलाकार

मुंबई - अनेक तत्त्ववेत्ते असे म्हणतात की, आयुष्यात तुम्ही ज्या गोष्टी करायचा निर्णय घेता त्याने तुमच्या आयुष्याला दिशा मिळत असते. मात्र, ही दिशा चुकली तर परत सावरण्यासाठी संधी मिळतचं नाही का? का आयुष्यात प्रत्येक क्षणी घडलेल्या फक्त चुका आठवून आपण सगळं आयुष्यच नकारात्मक करून टाकतो? या सगळ्या जमाखर्चाचा शेवट प्रचंड नैराश्य येऊन त्यातून आयुष्य संपवून टाकणं एवढाच असतो का? गेल्या काही दिवसांपासून अभिनय क्षेत्रात एकामागून एक घडलेल्या आत्महत्या पाहता या क्षेत्रातील व्यक्ती एवढ्या टोकाचा निर्णय का बरं घेतात? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

१४ जून २०२० ला अभिनेता सुशांतसिंह राजपूतने त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तेव्हापासूनच खरं तर या चर्चेला तोंड फुटले, पैसा, किर्ती, यश, मानमरतबा हे सारे काही असूनही अवघ्या ३२ व्या वर्षी सुशांतने एवढ्या टोकाचा निर्णय का घेतला? या प्रकरणाच्या तपासाअंती आत्महत्या, घातपात किंवा जे काही असेल ते समोर येईलही, पण मुळात मनापासून जगण्याची, सतत काहीतरी नवीन करू पाहण्याची इच्छा असलेल्या अभिनेत्याला जीवन संपवून टाकावे, असा टोकाचा निर्णय का घ्यावासा वाटला असेल?

चित्रपटसृष्टी किंवा छोटा पडदा हा जेवढा ग्लॅमरस आहे तेवढाच तो प्रत्येकासाठी आव्हानात्मकही आहे. प्रत्येक दिवशी तो तुम्हाला नवीन आव्हानांचा सामना करायला लावतो. तुमच्या दिसण्याइतकेच तुमच्या सातत्यपूर्ण काम करण्याला या क्षेत्रात तेवढेच महत्त्व आहे. येथे यश आहे, पैसा आहे, ग्लॅमर आहे, मान आहे, तसेच स्पर्धा, तुलना आणि अपयशही आहे. अडचणींवर मात करून नव्याने उभारी घेण्याचे आव्हान देखील आहे. काम मिळवण्यासाठी पडेल ते काम करून दिवस काढावे लागतात. पाय खेचणारे कितीही भेटले तरीही एक दिवस नक्की माझा असेल असे स्वतःच्या मनाला सांगत दररोज नव्या इर्षेने पुन्हा पेटून उभे रहावे लागते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा संघर्ष करताना तुम्ही कायम एकटे असता, प्रत्येकवेळी तुम्हाला बोलायला मन मोकळे करायला कुणी मिळेलच, याची आजिबात शाश्वती नाही. या संघर्षात जो टिकतो तो पुढे जातो. तोच कदाचित पुढे नवाझुद्दीन सिद्दीकी किंवा इरफान खान बनतो. गेल्या काही दिवसात घडलेल्या आत्महत्या पाहिल्या की, वरील काही गोष्टी करायला या कलाकारांना जमले नाही हे, आपल्याला नक्की लक्षात येईल. असे मत ज्येष्ठ सिनेसमीक्षक दिलीप ठाकूर यांनी ‘ई टीव्ही भारत’शी बोलताना व्यक्त केले.

अभिनय क्षेत्रातील वाढत्या आत्महत्यांबाबत तज्ञांनी आपले मत व्यक्त केले

ग्लॅमर वर्ल्डमध्ये लोकांचे एकमेकांशी असलेले नातेसंबंध अत्यंत प्रोफेशनल असतात. त्यात फोटोपुरता कितीही भावनिक ओलावा दिसला तरीही प्रत्यक्षात तो असतोच असे नाही. त्यामुळे येथील नाती ही फक्त कामापुरती असतात. या क्षेत्रातील बहुतेकजण दोन चेहरे घेऊन जगत असतात. एक चेहरा जो ते सार्वजनिक आयुष्यात घेऊन फिरतात आणि दुसरा जे ते स्वतःच्या खासगी आयुष्यात घेऊन जगत असतात. अनेकदा या दोन्ही चेहऱ्यांना घेऊन जगताना अडचणीत सापडल्याने ते नैराश्याच्या गर्तेत अडकतात. पैसा, यश, किर्ती हे सर्व मिळाल्यावर व्यसनांची सवयही लागते. ही व्यसने दिवसेंदिवस वाढत गेली की मानसिक ताबा सुटून टोकाचा निर्णय घेण्यासाठी व्यक्ती कारणीभूत ठरतात. ग्लॅमर क्षेत्रातील व्यक्तींच्या नैराश्याच्या आहारी जाण्यामागे अनेकदा ही कारणे असल्याचे मानसोपचार तज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले.

सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन, बॉलिवूड स्टार सुशांतसिंह राजपूत, टीव्ही अभिनेता समीर शर्मा, मराठी अभिनेता आशुतोष भाकरे आणि आता भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठक यांनी एकामागून एक आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. त्या अगोदर जिया खान, प्रत्युषा बॅनर्जी आणि कुशाल पंजाबी यांनीही आत्महत्या केल्या. काही जणांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत म्हणून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले, सुशांतच्याबाबत प्राथमिक तपासात नैराश्य हे कारण समोर आले, अनुपमा पाठक यांची आर्थिक फसवणूक झाल्याचे कारण समोर आले. पण समीर शर्मा आणि आशुतोष भाकरे यांच्याबाबतीत कोणतेही ठोस कारण पुढे आले नाही.

बहुतेकदा आत्महत्येमागे नैराश्य हे मुख्य कारण मानले जाते. कुठून आणि का येते हे नैराश्य? पोटभर जेवणारे आणि सगळ्या सोयी सुविधा आयुष्यात असणारेच नेमके नैराश्याने ग्रासलेले का असतात? ज्यांना आज कसे जगायचे आणि उद्या आपले काय होणार हे देखील माहित नसणारे गरीब भुके कंगाल, आपला आणि कुटुंबाचा जीव मुठीत धरून शेकडो मैल पायपीट करणारे जीव कधीच नैराश्याने जीवन संपवताना का दिसत नाहीत? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य माणूस म्हणून आपल्याला पडतात. मात्र, नैराश्य ही एक मानसिक भावना आहे आणि ती कुणालाही येणे अगदी सहाजिक आहे. कधी नातेसंबंधात दुरावा आल्यामुळे, कधी अपेक्षाभंग झाल्यामुळे, कधी आर्थिक फटका बसल्यामुळे, तर कधी मानसिक धक्का बसल्यामुळेही नैराश्याची भावना बळावू शकते. अशावेळी गरज असते ती आपल्या जवळच्या व्यक्तीशी मनमोकळे बोलण्याची किंवा सरळ डॉक्टरांकडून रितसर उपचार घेण्याची. प्रत्यक्षात मात्र आत्महत्या करणारी व्यक्ती या दोन्ही गोष्टी करत नाही. त्यामुळे नैराश्याच्या खोल गर्तेत अडकून आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला जातो. सुशांत सिंहने तर उपचार घेतले होते मग तो का नाही वाचला? तर योग्य उपचार, योग्य आचार आणि योग्य विचार या मार्गाने तो चालला असता तर नक्कीच नैराश्यातून बाहेर आला, असे तज्ञांचे मत आहे. त्याच्या बाबतीत हे का घडले नाही? ते सध्या सुरू असलेल्या तपासाअंती आपल्याला कळेलच.

आपण ग्लॅमर वर्ल्डमधील आत्महत्यांच्या प्रकरणांची जशी चर्चा करतो, तशी नैराश्यावर मात करून गगन भरारी घेतल्याची कधीच होत नाही. रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांचे ब्रेकअप झाल्यानंतर दीपिका नैराश्याने गेली होती. त्यातून बाहेर पडण्यासाठी तिला सहा महिने लागले. मात्र, वेळेत घेतलेल्या योग्य उपचारांमुळे ती त्यातून बाहेर पडून पुन्हा एक यशस्वी अभिनेत्री म्हणून नाव कमावू शकली. या अवस्थेतून गेल्यानंतर मानसिक आरोग्यावर काम करण्याची गरज तिच्या लक्षात आल्याने तीने ‘लिव लव लाफ’ ही मानसिक आरोग्यावर काम करणारी सामाजिक संस्थाही सुरू केली. बॉलिवूडचा किंग समजला जाणारा शाहरूख खान याची २००१ साली खांद्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यावेळी त्याला आपण पूर्वीप्रमाणे काम करू शकू की नाही याबाबत खात्री वाटत नव्हती त्यामुळे तो नैराश्यात गेला. मात्र, नंतर मोठ्या जिद्दीने डॉक्टरांचे उपचार घेऊन तो यातून बाहेर आला. अभिनेत्री इलियाना डिक्रूझही यशाच्या शिखरावर असतानाच अचानक तिने नैराश्यात जाऊन सिनेमात काम करणे थांबवले. तिला आत्महत्या करण्याचे विचारही येऊन गेले. मात्र, योग्यवेळी वैद्यकीय सल्ला घेऊन स्वतःवर उपचार करून घेऊन ती या अवस्थेतून बाहेर पडली.

पाच महिने चाललेल्या लॉकडाऊनमुळे दररोज तासन् तास शुटिंग करणारे कलाकार आज घरात अडकून पडले आहेत. आपले पुढे काय होणार? हा विचार सगळ्यांप्रमाणे त्यांनाही सतावतो आहे. एकीकडे गरजा वाढत चाललेल्या असताना उत्पन्नाचे स्रोत मात्र, आटत चालले आहेत. उद्योग क्षेत्राला मंदीची झळ बसल्याने मार्केटिंग, प्रमोशन, जाहिराती यांच्यावर होणाऱ्या खर्चात कपात झाली आहे. हाताला काम नसल्याने कलाकारांमधील नैराश्याची भावना वाढू लागली आहे. यातूनच टोकाचा निर्णय घेऊन आयुष्य संपवण्याकडे अनेकांचा कल आहे. मात्र, ही परिस्थिती फक्त कलाक्षेत्राची नसून सगळ्याच क्षेत्रांची आहे, हे समजून घेतले पाहिजे. कोणतीच अवस्था कायमस्वरूपी नसते. हे दिवस देखील जातील हे मनाला बजावायला हवे. आज नाही तर उद्या प्रयत्न केले तर काम नक्की मिळेल. आर्थिक अडचणी आज नाही सुटल्या तर उद्या नक्की सुटतील. त्यासाठी जास्त मेहनत घेण्याची तयारी करावी लागेल. हाच विचार कलाविश्वात काम करणाऱ्या लोकांनी करण्याची खरी गरज आहे.

आयुष्य हे कायम एखाद्या रस्त्यावरील चढ-उतारांसारखेच राहणार, प्रत्येकवेळी ते तुमची नव्याने कसोटी पाहणार. सिनेमातील हिरोप्रमाणेच प्रत्येक आव्हानासाठी आपल्याला तयार रहावे लागेल. काही गोष्टी सोडून द्याव्या लागतील तर काही गोष्टी नव्याने आत्मसात कराव्या लागतील. मनात नैराश्याचे विचार बळावत असतानाच त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला तर ते फारसे अवघड नाही, एकदा शांत बसून स्वतःच्या मनाला हे बजावायला हवे. तरच यातून बाहेर पडणे शक्य होईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.