मुंबई - दीपिका पादुकोणने गेल्या वर्षी पार पडलेल्या कान फिल्म फेस्टीव्हलमधील एक जुना मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करताना दीपिकाने त्याला "ग्रीन रूम शेनॅनिगन्स ... # कॅन्स # थ्रोबॅक गुरूवार." असे शीर्षक दिले आहे. त्यानंतर काही मिनिटातच तिच्या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त करताना कार्तिकने तिला प्रश्न विचारला. "शेनॅनिगन्स म्हणजे?"
दीपिकाने एका चांगल्या शिक्षिकेप्रमाणेच कार्तिक याच्या या प्रतिक्रियेला उत्तर दिले. तिने लिहिले, मुर्ख किंवा अतिउत्साही. खोडकर(जसा तू बऱ्याचवेळा असतोस)"असे लिहित तिने हसणारा इमोजी टाकला आहे.
या व्हिडिओला काही तासातच ३.७ दशलक्ष व्यूव्ह्ज मिळाले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दीपिका आणि कार्तिकची ही सोशल मीडियावर पहिली नौकझौक नाही. यापूर्वी कार्तिकने सोशल मीडियावर आपली दाढी काढावी की नाही असे विचारले होते. तेव्हा दीपिकाने हात उंचावलेल्या एका मुलीच्या इमोजीसह दाढी काढावी अशी प्रतिक्रिया दिली होती. गंमत म्हणजे, दीपिकासारख्या मुलीशी लग्न करण्याची इच्छा एकदा कार्तिकने बोलून दाखवली होती. जी आपल्या नवऱ्याबद्दलचा अभिमान दाखवते, अशी टिप्पणी त्याने केली होती.