ETV Bharat / sitara

"करण जोहरच्या पार्टीत बॉलिवूड स्टार्स ड्रग्जच्या नशेत बेधुंद?" व्हिडीओमुळे खळबळ - Milind Devra

करण जोहरने दिलेल्या पार्टीत बॉलिवूड स्टार्सची मांदियाळी जमली होती. याचा एक व्हिडीओ करणने शेअर केला हे. या व्हिडीओत तारे तारका ड्रग्ज सेवन करीत असल्याचा खळबळजनक आरोप दिल्लीचे आमदार मजींदर एस. सिरसा यांनी केलाय.

बॉलिवूड स्टार्स ड्रग्जच्या नशेत बेधुंद?
author img

By

Published : Jul 31, 2019, 5:12 PM IST

Updated : Jul 31, 2019, 7:29 PM IST

मुंबई - बॉलिवूड निर्माता करण जोहरने त्याच्या घरी जोरदार पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलिवूडचे तारे तारका हजर होते. यात शहिद कपूर,रणबीर कपूर, दीपिका पदूकोण, अर्जुन कपूर, वरुण धवन, विकी कौशल या दिग्गज कलाकारांचा समावेश होता. या पार्टीच्या यजमानाने व्हिडीओ शेअर केला. मात्र, त्यावरुनच नव्या वादाला जन्म मिळाला आहे. शिरोमणी अकाली दलाचे आमदार मजींदर एस. सिरसा यांनी यांनी करण जोहरचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला त्यांनी शीर्षक दिलंय, 'फिक्शन व्हर्सेस रियॅलिटी.'

त्यांनी पुढे लिहिलंय, ''पाहा, बॉलिवूडचे हे सितारे किती अभिमानाने ड्रग सेवन करतना दिसतात. बॉलिवूड स्टार्सकडून ड्रग घेण्याच्या गैरवर्तनाच्या विरुध्द मी आवाज उठवत आहे. जर तुम्हाला ही गोष्ट तिरस्काराची वाटत असेल तर रिट्विट करा", असे म्हणत मजींदरने शाहिद, दीपिका, अर्जुन कपूर, वरुण, करण आणि विक्की कौशल यांना टॅग केले आहे.

  • My wife was also present that evening (and is in the video). Nobody was in a “drugged state” so stop spreading lies & defaming people you don’t know!

    I hope you will show the courage to tender an unconditional apology https://t.co/Qv6FY3wNRk

    — Milind Deora मिलिंद देवरा (@milinddeora) July 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मजींदरच्या या ट्विटला काँग्रेसचे नेते मिलींद देवरा यांनी उत्तर दिले आहे. मजींदर यांना रिट्विट करीत त्यांनी लिहिलंय, ''माझी पत्नीदेखील या पार्टीत हजर होती. कोणताही कलाकार ड्रग सेवन करीत नव्हता. ज्यांना तुम्ही ओळखत नाही त्यांच्याबद्दल अफवा पसरवणे बंद करा. तुम्ही माफी मागण्याची हिंमत दाखवाल अशी अपेक्षा करतो.''

करण जोहरच्या या पार्टीमध्ये झोया अख्तर, आयन मुखर्जी, नताशा दलाल आणि मलायका अरोरा यांचीही उपस्थिती होती.

Intro:Body:

entertainment

Conclusion:
Last Updated : Jul 31, 2019, 7:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.