ETV Bharat / sitara

ट्विटरवर ट्रेंड होतोय #नॉट माय दीपिका ट्रेंड, हे आहे कारण - luv ranjan

दीपिका आणि रणवीर शुक्रवारी रात्री लव रंजनच्या घराबाहेर स्पॉट झाले. ज्यामुळे ही जोडी लव रंजनच्या आगामी चित्रपटात झळकणार असल्याचं वृत्त समोर येऊ लागलं.

ट्विटरवर ट्रेंड होतोय #नॉट माय दीपिका ट्रेंड
author img

By

Published : Jul 20, 2019, 11:48 PM IST

मुंबई - दीपिकाचे चाहते सध्या ट्विटरवर मोठ्या प्रमाणात नॉय माय दीपिका हा ट्रेंड चालवताना दिसत आहेत. हा ट्रेंड यासाठी आहे, की दीपिकाने लव रंजन यांच्यासोबत काम करू नये. दिग्दर्शक लव रंजन यांच्यावर मीटू मोहिमेअंतर्गत लैंगिक शोषणाचा आरोप केला गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपिका आणि रणवीर शुक्रवारी रात्री लव रंजनच्या घराबाहेर स्पॉट झाले. ज्यामुळे ही जोडी लव रंजनच्या आगामी चित्रपटात झळकणार असल्याचं वृत्त समोर येऊ लागलं. यानंतर माध्यमांतून दीपिका आणि रणबीर पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करण्याची शक्यता असल्याची आनंदाची बातमी येण्याआधीच लोकांनी दीपिकाला या चित्रपटात काम करण्यासाठी विरोध करायला सुरूवात केली.

दीपिकाच्या चाहत्यांनी याविरोधात आवाज उठवत, तू लव रंजनसोबत काम करू नकोस, असा सल्ला देण्यास सुरूवात केली आणि ट्विटरवर नॉट माय दीपिका ट्रेंड सुरू झाला. दीपिका अनेकदा सामाजिक विषयांवर भाष्य करत असते. यासोबतच लैंगिक शोषणाविरोधातही ती आवाज उठवत असते. अशात ती लव रंजनसोबत काम कसं करू शकते, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे.

Intro:Body:

Entertainment

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.