मुंबई - आगामी 'सर्कस' या चित्रपटासाठी रणवीर सिंगसोबत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणची निवड निश्चित केल्यानंतर रोहित शेट्टी याने आपली स्टारकास्ट आणखी तगडी बनवली आहे. दीपिकाने रणवीरच्या चित्रपटात पाहुणी कलाकार म्हणून काम करण्यास होकार दिला आहे. हा चित्रपट विल्यम शेक्सपियरच्या 'द कॉमेडी ऑफ एररस' या नाटकावर आधारित आहे.
रणवीर आणि दीपिकाचe '83' हा चित्रपट अद्याप पडद्यावर झळकलेला नाही. असे असले तरी बॉलिवूडचे हे पॉवर कपल प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी आधीच तयार झाले आहे. एका वेबलॉईड अहवालानुसार, दीपिकाचे सर्कसमध्ये खास दर्शन होणार आहे. यात तिचे निवडक संवादासह एक गाणे तिच्यावर चित्रीत होणार आहे.
गेल्या नोव्हेंबरमध्ये 'सर्कस' या चित्रपटाचे शुटिंग मुंबईत सुरू झाले आहे. ऊटी आणि गोव्यातही या चित्रपटाचे शुटिंग पार पडणार आहे. यात रणवीर सिंगची दुहेरी भूमिका असेल. याबरोबरच यात पूजा हेगडे, जॅकलिन फर्नांडिज, वरुण शर्मा, जॉनी लीव्हर, संजय मिश्रा, सिद्धार्थ जाधव आणि व्रजेश हिरजी यांच्या मुख्य भूमिका आहेत. २०२१ च्या हिवाळ्यात 'सर्कस' रिलीज होणार आहे.
विल्यम शेक्सपियरच्या 'द कॉमेडी ऑफ एररस' या नाटकावर आधारित यापूर्वी १९८२ मध्ये 'अंगूर' हा चित्रपट बनवला होता. यात संजीव कुमार आणि देवेन वर्मा यांनी भूमिका साकारल्या होत्या. त्याबरोबरच बिमल रॉय यांनीही याच विषयावर 'दो दुनी चार' हा १९६८ मध्ये चित्रपट बनवला होता. त्यात असित सेन यांनी मुख्य भूमिका केली होती.
हेही वाचा - ‘रंग माझा सावळा’ : व्हीएलसीसी मिस इंडिया २०२०, उपविजेती, मान्या सिंग!