मुंबई - आजकाल आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करणे कोणतेही कलाकार सोडत नाहीत. अशात अजय तरी या गोष्टीपासून लांब कसा राहिलं. नुकतंच अजय, तब्बू आणि रकुल प्रीतने आपल्या आगामी 'दे दे प्यार दे' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली.
कपिल शर्माने आपल्या नेहमीच्या अंदाजात या टीमचं मनोरंजन केलं. शोचं शूटींग पूर्ण होताच कपिलने चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत काही फोटो काढले. लवकरच कपिल शर्मा शोचा हा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येईल. दरम्यान अकिव अली दिग्दर्शित 'दे दे प्यार दे' चित्रपट येत्या १७ तारखेला प्रदर्शित होणार आहे.
![de de pyar de](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3194560_ajay2.jpg)
भूषण कुमार, किशन कुमार आणि लव रंजन यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात अजय आशिष नावाच्या ५० वर्षांच्या व्यक्तीचं पात्र साकारत आहे. तर रकुल आयशा नावाचं २६ वर्षाच्या तरूणीचं पात्र साकारत आहे. जी आशिषची गर्लफ्रेंड आहे. तर तब्बू अजयच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.
![de de pyar de](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3194560_ajay.jpg)