ETV Bharat / sitara

FILM REVIEW: नात्याच्या गुंत्यात अडकलेल्या प्रेमाची कथा, 'दे दे प्यार दे'

५० वर्षांचा पुरुष एका २६ वर्षाच्या मुलीच्या प्रेमात पडला तर त्याच्या आयुष्यात नक्की काय काय होऊ शकेल याची रंजक गोष्ट म्हणजेच 'दे दे प्यार दे' हा सिनेमा आहे.

'दे दे प्यार दे'
author img

By

Published : May 17, 2019, 11:08 AM IST

मुंबई - दोन स्त्रीयांच्या प्रेमात एकाचवेळी पडलेला पुरुष, घरवालीला धोका देऊन बाहरवालीसोबत मजा करणारा पुरुष किंवा एकाच वेळी अनेक मुलींच्या प्रेमात पडलेला प्रेमवीर, अशा अनेक कथांवर आधारित सिनेमे आपण पाहिलेत. मात्र ५० वर्षांचा पुरुष एका २६ वर्षाच्या मुलीच्या प्रेमात पडला तर त्याच्या आयुष्यात नक्की काय काय होऊ शकेल याची रंजक गोष्ट म्हणजेच 'दे दे प्यार दे' हा सिनेमा आहे.

दिग्दर्शन आणि निर्मिती -
साध्या सरळ वाटणाऱ्या पण तशा अजिबात नसणाऱ्या नातेसंबंधांवर आधारित सिनेमे बनवण्यात निर्माता लव रंजनचा हात कुणीच धरू शकत नाही. यावेळी निर्माता लवने दिग्दर्शक अकीव अलीच्या साथीने असाच एक वेगळा पण तेवढाच मनोरंजक सिनेमा बनवला आहे.

काय आहे कथा -
आकाश म्हणजेच अजय देवगण हा ५० वर्षाचा लंडनस्थित उद्योगपती आपल्या मित्राच्या बॅचलर पार्टीच्या निमित्ताने इशिता म्हणजेच अभिनेत्री रकुल प्रीत या २६ वर्षीय मुलीला भेटतो. तिचं सौंदर्य आणि वागणूक पाहून तिच्याकडे आकर्षित होतो. दुसरीकडे लंडनमध्ये शिकायला आलेली इशिता आकाशच्या आयुष्यातील रितेपण, त्याचा पैसा आणि सरत्या वर्षातही राखलेला चार्म पाहून आकर्षित होते. सुरुवातीला वयातील अंतर आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न याचा विचार करून हे दोघे वेळीच दूर जाण्याचा निर्णय घेतात. मात्र नंतर न रहावल्याने एका वळणावर वय समाज कशाचीही पर्वा न करता हे दोघे लग्न करण्याचा निर्णय घेतात. मात्र लग्न करण्यापूर्वी १६ वर्षांपूर्वी भारतात सोडून आलेल्या आपल्या पत्नी आणि मुलांना हा निर्णय एकदा सांगायचा असं ठरवून आकाश ईशिताला घेऊन भारतात येतो आणि इथून सिनेमाची खरी गोष्ट सुरू होते. इकडे भारतात आकाशाची पत्नी इंदू म्हणजे तब्बू, त्याचा एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील असं कुटुंब असतं. या कुटुंबात परतल्यावर नक्की काय होतं. आकाशला इशिताशी लग्न करायची परवानगी मिळते का..? इंदू इशिताला सवत म्हणून स्वीकारते का..? का त्यांच्या नात्यात अजून काही नवे प्रश्न ऊभे राहतात, ते पाहायचं असेल तर त्यासाठी हा सिनेमा पाहायला हवा.

उत्तम कथा आणि संवाद -
सिनेमाचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे त्याची पटकथा आणि संवाद, भावनाप्रधान आणि नातेसंबंध यांची गुंफण असलेल्या सिनेमात मोजके पण चांगले संवाद असतील तर ते सिनेमाला नवी उंची मिळवून देऊ शकतात. उत्तम संवाद आणि प्रसंगाची योग्य मांडणी झाल्याने हा सिनेमा अजिबात कंटाळवाणा वाटत नाही. उलट पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम राहते.

कलाकारांचे उत्तम अभिनय -
उत्तम संवादाला कायम जोड लागते ती तितक्याच उत्तम कलाकारांची. अजय देवगणने त्याच्या वयाला साजेशी ही भूमिका अतिशय सहजपणे केली आहे. त्याच्या पत्नीच्या भूमिकेत तब्बूनेही त्याला मस्त साथ दिली आहे. गेस्ट म्हणून जिमी शेरगिल, सनी सिंग आणि जावेद जाफरी यांनीही आपापल्या छोट्याशा भूमिकेत मजा आणली आहे. मात्र या सिनेमातली हुकुमाची राणी आहे अभिनेत्री रकुल प्रीत. 'यारीया' मध्ये दिसूनही लक्षात न राहिलेली आणि 'अय्यारी'मध्ये निव्वळ फुकट गेलेल्या रकुलने या सिनेमात सगळी कसर भरून काढली आहे. सिनेमाभर ती अतिशय सुंदर तर दिसली आहेच पण ईशितची भूमिका तिने मनापासून केली आहे. त्यामुळे सिनेमा संपला तरी रकुल प्रीतचं काम आवर्जून लक्षात राहतं.

उत्तम चढउतार -

सिनेमाची गाणी पंजाबी माहोल तयार करणारी आहेत, जी ठिकठाक आहेत. सिनेमाचे लोकेशन्स सिनेमॅटोग्राफीपेक्षा जास्त लक्षात राहतात. मुख्य म्हणजे नातेसबंधाचे चढउतार सुरू असताना विनोदी मांडणीमुळे रंगत वाढत जाते. नाही म्हटलं तरी शेवटाकडे केलेला इमोशनल सियापा थोडा कमी होऊ शकला असता तरी चाललं असतं, अस राहून राहून वाटतं. पण त्याने फारसं काही बिघडत नाही. प्रॅक्टिकल आयुष्य जगणाऱ्या लोकांची प्रॅक्टिकल गोष्ट मांडणारा हा सिनेमा प्रॅक्टिकल सोल्युशन देऊनच संपतो.

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.