ETV Bharat / sitara

अजयच्या 'दे दे प्यार दे'नं पहिल्याच दिवशी केली इतकी कमाई - rakul preet

अजय देवगण, रकुल प्रीत आणि तब्बू यांच्या मुख्य भूमिका असलेला 'दे दे प्यार दे' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. प्रदर्शनानंतर सकाळी प्रेक्षकांचा तितकासा प्रतिसाद मिळाला नाही, मात्र सायंकाळी आणि रात्री प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर गर्दी करण्यास सुरूवात केली.

'दे दे प्यार दे'नं केली इतकी कमाई
author img

By

Published : May 18, 2019, 12:22 PM IST

मुंबई - अजय देवगण, रकुल प्रीत आणि तब्बू यांच्या मुख्य भूमिका असलेला 'दे दे प्यार दे' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. आता या चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई समोर आली आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली आहे.

शुक्रवारी चित्रपटाने १०.४१ कोटींचा गल्ला जमवला आहे. कमाईचे हे आकडे पाहता अजय, रकुल आणि तब्बूची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे, असे म्हणायला हरकत नाही. दरम्यान शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचा फायदाही चित्रपटाच्या कलेक्शनला होऊ शकतो. त्यामुळे, आज आणि रविवारी कमाईचे हे आकडे आणखी वाढण्याची शक्यता आहे.

प्रदर्शनानंतर सकाळी प्रेक्षकांचा तितकासा प्रतिसाद मिळाला नाही, मात्र सायंकाळी आणि रात्री प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर गर्दी करण्यास सुरूवात केली. लव्ह रंजन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर अकिव अली यांचे दिग्दर्शन आहे. आता चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणखी किती गल्ला जमवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.