ETV Bharat / sitara

वरूण आणि नताशाच्या लग्नाबद्दल डेविड धवन म्हणतात,.... - relationship

त्यांच्या नात्यावर दिग्दर्शक डेविड धवन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत वरूण आणि नताशा पुढील वर्षी विवाहबंधनात अडकू शकतात असे त्यांनी म्हटले आहे.

वरूण आणि नताशाच्या लग्नाबद्दल डेविड धवनची प्रतिक्रिया
author img

By

Published : Apr 27, 2019, 2:57 PM IST

मुंबई - अभिनेता वरूण धवन आणि नताशा गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा हे कपल एकत्र स्पॉटदेखील झालं आहे. इतकंच काय तर वरूणच्या घरी असणाऱ्या अनेक कार्यक्रमातही नेहमीच नताशाची उपस्थिती असते. यावरूनच दोघांच्या नात्याला कुटुंबीयांची समंती असल्याचे दिसते.

आता त्यांच्या नात्यावर दिग्दर्शक डेविड धवन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत वरूण आणि नताशा पुढील वर्षी विवाहबंधनात अडकू शकतात, असे डेविड धवन यांनी म्हटले आहे. यासोबतच त्यांच्यातील चांगल्या नात्यामुळे मी आनंदी असून एका वडिलांसाठी यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असू शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.

आता डेविड धवनने तर वरूण आणि नताशाच्या लग्नाला परवानगी दिली आहे. त्यामुळे, ही जोडी लग्नगाठ कधी बांधणार याकडेच वरूणच्या चाहत्यांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान वरूण नुकताच 'कलंक' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटातील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंतीही मिळाली.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.