ETV Bharat / sitara

'दसवी'चा ट्रेलर: यामी गौतमने तुरुंगात अभिषेक बच्चनला शिकवला शिक्षणाचा धडा - अभिषेक यामी गौतम दसवी ट्रेलर

दसवीच्या ट्रेलरमध्ये अभिषेक बच्चन एका मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारत आहे जो तुरुंगात बंद आहे आणि त्याला दहावीची परीक्षा द्यायची आहे. तुषार जलोटा या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. या चित्रपटाचे लेखन रितेश शाह यांनी केले आहे. हा चित्रपट ७ एप्रिल २०२२ पासून जिओ सिनेमा आणि नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

अभिषेक यामी गौतम दसवी ट्रेलर
अभिषेक यामी गौतम दसवी ट्रेलर
author img

By

Published : Mar 23, 2022, 12:34 PM IST

मुंबई - अभिषेक बच्चन, यामी गौतम आणि निम्रत यांच्या भूमिका असलेला दसवी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. मिश्कील विनोद, नाट्यमय प्रसंग आणि महत्त्वाचा संदेश असलेल्या या चित्रपटात अभिषेक एका मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारत आहे जो तुरुंगात शिक्षा भोगत असून त्याला शिक्षणाचा अधिकार वापरायचा आहे. अडीच मिनिटांच्या ट्रेलरमध्ये गंगाराम चौधरीची भूमिका करणारा अभिषेक कसा तुरुंगात जातो हे दाखवण्यात आले आहे. जेलमध्ये त्याची गाठ आयपीएस अधिकारी ज्योती देसवालशी पडते. या भूमिकेत यामी गौतम कडक दिसत आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

दसवी या सामाजिक विनोदी चित्रपटात निम्रत कौर ही बिमला देवीच्या भूमिकेत आहे जी अभिषेक बच्चन भूमिका करीत असलेल्या गंगा रामची पत्नी आहे. गंगाराम जेलमध्ये गेल्यानंतर बिमला देवी मुख्यमंत्री बनते आणि हे पद तिला हवेहवेसे वाटू लागते. दरम्यान दहावीचा अभ्यास जेलमध्ये करताना गंगा राम दिसतो. हे सर्व प्रसंग चित्रपटाची रंगत वाढवणारे आहेत. चित्रपटाचा ट्रेलर उत्कंठा वाढवणारा आहे.

'दसवी' हा चित्रपट 'हिंदी मीडियम', 'आंग्रेजी मीडियम' आणि 'बाला' चित्रपटाच्या निर्मात्यांचा आगामी प्रोजेक्ट आहे. तुषार जलोटा या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करत आहे, ज्याचे लेखन रितेश शाह यांनी केले आहे. दसवी चित्रपटाला दिनेश विजन, संदीप लेझेल आणि शोभना यादव यांनी बँकरोल केले आहे. हा चित्रपट मॅडॉक फिल्म्स प्रोडक्शन आणि बेक माय केक फिल्म्सच्या बॅनरखाली तयार केला गेला आहे. दसवी 7 एप्रिल 2022 पासून Jio सिनेमा आणि Netflix वर स्ट्रिमिंग होणार आहे.

हेही वाचा - बॉलिवूड पदार्पणापूर्वीच शनाया कपूरने खरेदी केली ८० लाखाची आलिशान कर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.