ETV Bharat / sitara

कोरोना इफेक्ट: 'गुलाबो सिताबो'सह हे 7 भारतीय चित्रपट होणार ऑनलाईन प्रदर्शित - सात भारतीय चित्रपट होणार ऑनलाईन प्रदर्शित

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे चित्रपटगृहही बंद असल्याने तयार चित्रपटही प्रदर्शित होऊ शकले नाहीत. अशात अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराणाचा गुलाबो सिताबो चित्रपट डिजीटल रिलीज करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. यानंतर आता आणखी सहा चित्रपटांचे डिजीटल प्रीमीयर ऑनलाईन दाखवले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे

7 भारतीय चित्रपट होणार ऑनलाईन प्रदर्शित
7 भारतीय चित्रपट होणार ऑनलाईन प्रदर्शित
author img

By

Published : May 15, 2020, 1:37 PM IST

­­­मुंबई - कोरोना विषाणूचा फटका सिनेसृष्टीलाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. या विषाणूच्या संसर्गामुळे चित्रपटगृहही बंद असल्याने तयार चित्रपटही प्रदर्शित होऊ शकले नाहीत. अशात अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराणाचा गुलाबो सिताबो चित्रपट डिजीटल रिलीज करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. यानंतर आता आणखी सहा चित्रपटांचे डिजीटल प्रीमीयर ऑनलाईन दाखवले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

यात विद्या बालन स्टारर शकुंतला देवीसह इतरही चर्चित चित्रपटांचा समावेश आहे. पुढील काही महिन्यांत हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हे सर्व चित्रपट थिएटरमध्ये रिलीज न होता थेट अमॅझोन प्राईमवर पाहता येणार आहेत. हिंदीशिवाय पोनमगल (तमिळ आणि तेलुगू), सुफियम सुजातायम ( मल्ल्याळम), लॉ (कन्नड), फ्रेंच बिर्याणी (कन्नड) हे चित्रपटही ऑनलाईन प्रदर्शित करण्यात आले आहेत.

पुढील 3 महिन्यांत हे चित्रपट ऑनलाईन प्रदर्शित होतील. जवळपास 200 देशांमधील प्रेक्षक हे सिनेमे पाहू शकतात. पोनमगल वंढल हा तमिळ सिनेमा 29 मे रोजी ऑनलाईन स्ट्रीम होणार आहे. तर, पेंग्विन सिनेमा 19 जून, लॉ 26 जून आणि फ्रेंच बिर्याणी 24 जुलैला प्रदर्शित होणार आहे.

हिंदीमध्ये सुजित सरकार यांचा गुलाबो सिताबो 12 जुनला प्रदर्शित होणार आहे. तर, शकुंतला देवी आणि सुफियम सुजातायम या सिनेमांच्या रिलीज डेट अद्याप जाहीर केल्या गेल्या नाहीत. हे सात भारतीय चित्रपट ऑनलाईन प्रदर्शित होत आहेत, हे भारतासाठी एक पुढचे पाऊल असल्याचे अमॅझोन प्राईम व्हिडिओचे डायरेक्टर विजय सुब्रमणीयम यांनी म्हटलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.