मुंबई - अभिनेता अनुपम खेर यांच्या कुटुंबियांना कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे. त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबद्दल अनुपम यांनी निवेदन केले आहे. अनुपम खेर यांनी मंगळवारी पहाटे सांगितले की, त्यांची आई दुलारी यांना वेगळ्या वॉर्डमध्ये हलविण्यात आले आहे, तर त्याचा भाऊ राजूचे कुटुंब घरीच उपचार घेत आहे.
अनुपम यांनी आपली आई व भावाच्या कुटुंबियांना कोरोना बाधा झाल्याचे ट्विटरवर सांगितले होते. चाहत्यांनी त्यांना जो पाठिंबा दिलाय त्याबद्दल खेर यांनी सरवांचे आभार मानले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
“माझ्या प्रिय मित्रांनो, तुम्ही माझी आई दुलारी, भाऊ राजू आणि त्याचे कुटुंबीय लवकर बरे व्हावेत यासाठी पाठविलेल्या तुमच्या संदेशाबद्दल आणि आशीर्वादांबद्दल धन्यवाद. मी सोशल मीडियावरील प्रत्येक संदेशास वैयक्तिकरित्या प्रतिसाद देऊ शकत नाही परंतु मी मनापासून तुमचे सर्वांचे आभार मानू इच्छितो," असे खेर यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
ते म्हणाले, "जेव्हा कुटुंबातील चार लोकांना कोरोनाव्हायरसचे निदान झाले तेव्हा चिंता करणे स्वाभाविक आहे. परंतु या काळात मला आपल्या लोकांचा पाठिंबा मिळाला आणि यामुळे मला थोडा दिलासा व सकारात्मकता मिळाली."
आपल्या कुटूंबाच्या प्रकृतीची माहिती सांगतांना खेर म्हणाले: "माझ्या आईला आईसोलेशन वॉर्डमध्ये हलविण्यात आली आहे आणि राजू आणि त्याचे कुटुंबीय घरात क्वारंटाईनमध्ये ठेवले आहेत. मला खात्री आहे की ते चांगल्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत आणि ते लवकरच बरे होतील."
"मला आणखी एक गोष्ट सांगायची होती ती म्हणजे 'सोशल डिस्टन्सिंग' आणि 'सुरक्षित रहा' हे शब्द फक्त बोलण्यापुरते नाहीत. त्यांना खूप गांभीर्याने घेणे खूप महत्वाचे आहे, असे अखेर अभिनेता अनुपम खेर यांनी सांगितले.