मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनॉन कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजते. मात्र, स्वत: कृतीने अद्याप याबद्दल काहीही खुलासा केलेला नाही. फिल्मफेअर डॉट कॉमच्या वृत्तानुसार, कृती तिचा आगामी चित्रपटाचे शूटिंग राजकुमार राव याच्यासोबत चंदिगडमध्ये गेल्या आठवड्यापर्यंत करीत होती. सेलिब्रेटी फोटोग्राफर व्हायरल भयानी यांनी कृतीचा एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे, ज्यामध्ये "कोविड पॉझिटिव्ह" असे लिहिले आहे.

भयानी यांनी फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "सर्व सावधगिरीचे उपाय अवलंबले गेल्यानंतरही ते फक्त दुर्दैव म्हणता येईल. राजकुमार रावसोबत चंदिगडमध्ये शुटिंग करुन ती नुकतीच परत आली. तिने सांगितले की एक क्षणही तिने आपला मास्क हटवला नव्हता."
हेही वाचा - वरुण धवन म्हणतो, कोरोनाच्या बाबतीत मी अधिक सावध राहायला हवे होते
व्हायरल भयानीने पोस्ट केलेल्या फोटो आणि कॅप्शनचा विचार करता कृतीला कोरोनाची बाधा झाली असावी अशी सध्या मीडियात चर्चा आहे.
हेही वाचा - अभिनेत्री जारा खानला बलात्काराची धमकी देणाऱ्या 'तरुणी'ला अटक