ETV Bharat / sitara

Sushant Singh Death Case : सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात निष्काळजीपणा झाल्याची राष्ट्रीय मानवधिकार आयोगाकडे तक्रार - मानवी हक्कांचे उल्लंघन

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी ( Sushant Singh Death Case ) वकील आशिष राय ( High Court Advocate Ashish Rai ) (मुंबई उच्च न्यायालय) यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासमोर तक्रार ( Complaint to National Human Rights Commission ) दाखल केली आहे. वैद्यकीय निष्काळजीपणाची तक्रार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने डायरी क्रमांक १२७५/IN/२०२२ द्वारे नोंदवली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या शवविच्छेदनाच्या ( Sushant Singh autopsy ) वेळी कूपर रुग्णालयातील डॉक्टरांच्या पॅनेलने आणि मुंबई पोलिसांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही, असे तक्रारीत म्हटले आहे.

सुशांत सिंह राजपूत
सुशांत सिंह राजपूत
author img

By

Published : Jan 21, 2022, 4:04 PM IST

Updated : Jan 21, 2022, 4:36 PM IST

मुंबई - सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी ( Sushant Singh Death Case ) वकील आशिष राय ( High Court Advocate Ashish Rai ) (मुंबई उच्च न्यायालय) यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासमोर तक्रार ( Complaint to National Human Rights Commission ) दाखल केली आहे. वैद्यकीय निष्काळजीपणाची तक्रार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने डायरी क्रमांक १२७५/IN/२०२२ द्वारे नोंदवली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या शवविच्छेदनाच्या ( Sushant Singh autopsy ) वेळी कूपर रुग्णालयातील डॉक्टरांच्या पॅनेलने आणि मुंबई पोलिसांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही, असे तक्रारीत म्हटले आहे. शवविच्छेदनादरम्यान अनेक दोष आढळून आले. त्यामुळे मानवी हक्कांचे उल्लंघन ( Human rights violations ) झाले आहे, तसेच देशातील सर्वोच्च तपास यंत्रणांनाही तपासादरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.

वकील आशिष राय

अ) सुशांत सिंह राजपूतचा व्हिसेरा योग्यरित्या जतन केला गेला नाही, जे स्पष्टपणे एक प्रमुख 'निष्काळजीपणा' दर्शवते.

ब) कूपर हॉस्पिटलने सुशांत सिंहच्या शवविच्छेदनाची व्हिडिओग्राफी केलेली नाही.

c) अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे शवविच्छेदन घाईघाईत करण्यात आले. मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमार्टममध्ये सहभागी असलेल्या डॉक्टरांच्या टीमवर दबाव आणला. मृतदेहाच्या शवविच्छेदनादरम्यान दोन्ही प्रशासन आपल्या अधिकाराचा गैरवापर करत असल्याचे या प्रकरणात दिसून येते.

ड) अभिनेता सुशांतच्या दिवंगत मृतदेहाची प्रतिष्ठा आणि अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिलेल्या निर्देशांचे पालन केले गेले नाही.

आशिष राय यांची राष्ट्रीय मानवधिकार आयोगाकडे तक्रार

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासमोर वरील आशयाची तक्रार दाखल झाली असून यामुळे पुन्हा एकदा कूपर रुग्णालय प्रशासन व मुंबई पोलिसांच्यावर आरोप होत आहेत. या तक्रारीला मुंबई पोलीस कसे सामोरे जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा - सुशांत सिंह राजपुत जन्मदिन : टीव्ही ते मोठ्या पडद्यापर्यंतचा संस्मरणीय चित्र प्रवास

Last Updated : Jan 21, 2022, 4:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.