पणजी - आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मेक इन इंडिया (Make In India) अर्थातच भारतातील प्रादेशिक चित्रपट निर्मितीला प्रोत्सहन आणि व्यासपीठ मिळाले पाहिजे अशा प्रतिक्रिया सिनेरसिक, अभिनेते यांनी व्यक्त केल्या. दरम्यान, माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनीही रविवारी झालेल्या कार्यक्रमात आपण प्रादेशिक चित्रपट निर्मितीवर भर द्यावा, असे मत व्यक्त केले.
प्रादेशिक चित्रपटांना संधी मिळावी- अभिनेत्री इति आचार्य
भारतात प्रादेशिक चित्रपट निर्मिती होऊन त्यांना भारतातील चित्रपट महोत्सवातून प्रसिद्धी मिळाली, तर प्रादेशिक चित्रपट क्षेत्राला चांगले दिवस येतील व अनेक कलाकारांना नवीन संधी प्राप्त होईल, असे मत दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री इति आचार्य हिने 'ईटीव्ही' शी बोलताना सांगितले.
युवा सृजनशीलतेला प्राधान्य- प्रीतम शर्मा
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात प्रथमच चित्रपट महोत्सवात युवा सर्जनशीलतेला प्राधान्य देण्यात आले आहे. खेडी, ग्रामीण भागातील वास्तविकतेचे चित्र चित्रपटाच्या निमित्ताने मांडण्यात आले आहे, त्यामुळे काश्मीरसारख्या भागात काय परिस्थिती आहे, याची लोकांना जाणीव होईल, असे मत जन्मू काश्मीरहून या महोत्सवात सहभागी झालेल्या पत्रकार प्रीतम शर्मा यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - आर्यन खानविरुध्द कट रचणाऱ्यांना शाहरुख शिकवणार धडा?