ETV Bharat / sitara

सिने कर्मचारी संघटनेने लॉकडाऊन न लादण्याची मुख्यमंत्र्यांना केली विनंती - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सध्या कोरोनाचा जोर वाढू लागल्यामुळे महाराष्टात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावले जाऊ शकते. मात्र सिने क्षेत्रातील रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्माचाऱ्यांवर आधीच बेरोजगारीची कुऱ्हाड आहे. या क्षेत्राचे लॉकडाऊनमुळे आधीच नुकसान झालंय. त्यामुले लॉकडाऊन न करण्याची विनंती फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

cine-staff-union-fwice-urges-cm-not-to-impose-lockdown
लॉकडाऊन न लादण्याची मुख्यमंत्र्यांना केली विनंती
author img

By

Published : Apr 3, 2021, 5:36 PM IST

मुंबई - गेले जवळपास संपूर्ण वर्ष कोरोनामुळे वाया गेलं. देशाची आर्थिक घडी विस्कटली आणि साहजिकच तिथल्या नागरिकांचीही. लॉकडाऊनमुळे सर्वांचेच सर्व कामकाज ठप्प झाले होते व यात हातावर पोट असणाऱ्यांचे सर्वात जास्त हाल झाले होते. गेले वर्ष सरता सरता सामान्यजनांना एक आशेचा किरण दिसू लागला होता, कारण कोरोनावर मात करीत सर्वच व्यवसाय सुरु झाले होते. मनोरंजनसृष्टीही पुन्हा पूर्वपदावर येऊ लागली होती. शुटिंग्स सुरु झाली होती आणि सिनेमा हॉल्समध्ये चित्रपट प्रदर्शनही होऊ लागले होते. परंतु या सगळ्याला नजर लागली असं म्हणावं लागेल. कारण कोरोना विषाणू पुन्हा डोके वर काढू लागला असून कोव्हीड-१९ रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यात महाराष्ट्रात सर्वात जास्त, म्हणजे देशाच्या रुग्णसंख्येतील निम्म्याहून अधिक, रुग्ण सापडत असून परिसथिती गंभीर आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून पुन्हा लॉकडाऊन लागण्याच्या वावड्या उठत आहेत.

Letter from Federation of Western India Cine Employees
फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे पत्र

खरंतर कुणालाही लॉकडाऊन नकोय. परंतु कोरोना रुग्णसंख्या बघता तो पर्याय निवडला जाऊ शकतो अशी माहिती नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिली. मनोरंजनसृष्टीत बहुतांश कामगार ‘डेली वेज’ वर काम करतात आणि त्यांची गोची होण्याची संभावना FWICE चे अशोक पंडित यांनी व्यक्त केली. ही संस्था सिनेव्यवसायातील कामगार, कलाकार, टेक्निशियन्स आदी सर्वांच्या कल्याणासाठी कार्यरत असून त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी लढत असते. सद्यस्थिती पाहता लॉकडाऊन मुळे ‘डेली वेज’ कामगारांवर पुन्हा एकदा उपासमारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. मनोरंजनसृष्टीतील इतरही लोकांना याचा जबर फटका बसू शकतो. त्यामुळे FWICE ने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कृपया पुन्हा लॉकडाऊन लावू नये असे पत्राद्वारे कळविले आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून करमणूक उद्योगावर कुलूप लावू नये, असे आवाहन केले आहे. त्यांनी नमूद केले आहे की टीव्ही आणि चित्रपटसृष्टीवर अवलंबून असणाऱ्यांसाठी, त्यांच्या उपजीविकेवर आणखी एक लॉकडाऊन पुन्हा बेरोजगारीची परिस्थिती निर्माण करेल. एफडब्ल्यूआयसीईने हे पत्र त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरही शेअर केले आहे.

हेही वाचा - 'चली चली' या 'थलायवी'मधील गाण्यासाठी कंगना रणौतने केली होती कठोर मेहनत

या पत्रात असे नमूद केले आहे की महाराष्ट्रात कोव्हीड-१९ संक्रमित रूग्णांची संख्या वाढत असल्याने सरकार विशेषतः मुंबईत आणखी एक लॉकडाऊन लादण्याचा विचार करीत आहे. एफडब्ल्यूआयसीईने असे नमूद केले आहे की सध्यपरिस्थितीबद्दल ते तितकेच चिंतीत असले तरी माध्यम आणि मनोरंजन उद्योगातील सर्व कलाकार, तंत्रज्ञ आणि कामगार यांच्या वतीने आणखी एक लॉकडाऊन लादू नका, असे ते सरकारला आग्रह करत आहेत. पूर्वीच्या लॉकडाऊनने यापूर्वीच करमणूक उद्योगाच्या अर्थव्यवस्थेला हानी पोहचवली आहे आणि लोक पूर्वीच्या लॉकडाऊनमुळे झालेल्या नुकसानापासून मुक्त होण्यासाठी अद्याप प्रयत्न करीत आहेत.

आधीच्या लॉकडाऊन वेळी सिनेउद्योगातील अनेकांनी सढळ हस्ते या कामगारांना मदत केली. परंतु आता त्यांच्याही मर्यादा संपल्यागत आहेत. पैश्याचा ओघ आटल्यामुळे ते पुन्हा आर्थिक मदत करू शकणार नाहीत. त्यामुळे आमच्या कामगारांची परिस्थिती अजूनही खालावेल. त्यामुळे आमच्या विनंतीचा आदर करावा ही विनंती आम्ही करीत आहोत. पूर्वीच्या टाळेबंद्यांमुळे झालेली आर्थिक हानी अद्याप वसूल झालेली नाही. बरेच लोक आजही बेरोजगार आहेत. सरकारने पुन्हा लॉकडाऊन लादल्यास बेरोजगारी पुन्हा वाढू शकेल. आम्ही पुन्हा एकदा हा लॉकडाऊन लादू नये आणि या सर्वात मोठ्या उद्योगाच्या अर्थव्यवस्थेला अडथळा आणू नये यासाठी आम्ही आपणास व आपल्या सरकारला आग्रह करीत आहोत. हे सिनेउद्योगात काम करणार्‍या लोकांच्या दैनंदिन जीवनात अडथळा आणेल. या प्राणघातक रोगाविरुद्ध लढा देणे आणि सर्व सावधगिरी बाळगून त्याचा प्रसार थांबविणे ही काळाची गरज आहे आणि आम्ही उद्योगातील सर्व नियम व कायद्यांचे पालन करण्याचे आश्वासन देतो.

एफडब्ल्यूआयसीईने मुख्यमंत्र्यांना आश्वासन दिले आहे की ते सेटवर वैद्यकीय सुविधा वाढवतील आणि सर्व खबरदारी व मार्गदर्शक सूचना पाळतील.

हेही वाचा - विकी कौशलने केले सॅम माणेकशॉ यांचे जयंती निमित्य स्मरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.