ETV Bharat / sitara

#बालदिन विशेष : या सिनेमांमुळे मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही मिळाली शिकवण

author img

By

Published : Nov 14, 2019, 3:05 PM IST

सिनेमातून दिला जाणारा संदेश खूप प्रभावी ठरत असतो. त्यामुळे असे काही चित्रपट बनले ज्यांनी मुलांसह पालकांनाही खूप काही शिकवले. अशाच काही हिंदी सिनेमाबद्दल आज समजून घेऊयात.

अबालवृध्दांना भुरळ पाडलेले चित्रपट

बॉलिवूड चित्रपटांचा प्रेक्षक वर्ग पाहिला तर त्यात मुलांचीही संख्या प्रचंड मोठी आहे. सामान्यपणे असे मत व्यक्त होत असते की मुलांसाठी चित्रपट बनवणे आव्हानात्मक असते. हे काही प्रमाणात सत्यदेखील आहे. कारण मुलांना गुंतवून ठेवत मनोरंजन करणे सहज सोपे नाही.

असे असले तरी काही बॉलिवूड दिग्दर्शकांनी साहस करीत असे चित्रपट बनवले. याला अबालवृध्दांनी भरपूर प्रेम दिले. अशा काही चित्रपटांवर एक नजर टाकूयात.

तारे जमीन पर

Children week special:
अबालवृध्दांना भुरळ पाडलेले चित्रपट
२००८ मध्ये आलेल्या या चित्रपटाची निवड फिल्म फेअरच्या सर्वोत्कृष्ट पुरस्कारासाठी झाली होती. आठ वर्षे वयाच्या ईशान अवस्थी (दर्शील सफारी) या मुलाची कथा आहे. हा एक असा चित्रपट होता ज्याला प्रेक्षकांनी मुलाबाळांसह एकत्र बसून पाहिलाय. मुलामध्ये असलेल्या डिस्लेक्स‍ियाचा गंभीर विषय हळूवारपणे उलगडण्यात सिनेमाला चांगले यश मिळाले होते.

चिल्लर पार्टी

Children week special:
अबालवृध्दांना भुरळ पाडलेले चित्रपट
चिल्लर पार्टी या सिनेमाला २०११ मध्ये सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. एका सोसायटीत राहायला आलेल्या लहान मुलाची आणि त्याच्या कुत्र्याची ही गोष्ट आहे. तो कुत्रा हाकलून देण्यासाठी सोसायटी पाऊल उचलते. मात्र त्याच कॉलनीत राहणारी मुले एकत्र येऊन लढा देतात हे पाहणे मजेशीर होते. मुलांच्यातील एकी आणि प्रेमभावनेला चालना देणारा हा सिनेमा होता.

स्टेनली का डब्बा

Children week special:
अबालवृध्दांना भुरळ पाडलेले चित्रपट
एका सामान्य विद्यार्थ्याच्या दुपारच्या जेवणातील डब्याच्या भोवती फिरणारी ही सुंदर गोष्ट आहे. या चित्रपटात शाळेतील गमती जमती, शिक्षक, मित्र यांना पाहताना आपले बालपणीचे शालेय जीवन नक्की आठवायला हा सिनेमा भाग पाडतो. स्टेनली हा सामान्य गरीब मुलगा शाळेत लंच बॉक्स न घेताच येत असतो. ही गोष्ट शिक्षकांच्या लक्षात आल्यानंतर तो त्याला दुपारचे जेवण आणण्यासाठी भाग पाडतो. जर शाळेला यायचे असेल तर लंच बॉक्स आणलाच पाहिजे, अशी अट तो शिक्षक घालतो. त्यानंतर स्टेन्ली आपला डब्बा घेऊन शाळेत कसा येतो याची सुंदर गोष्ट या सिनेमात पाहायला मिळते.

आय एम कलाम

Children week special:
अबालवृध्दांना भुरळ पाडलेले चित्रपट

एका गरीब मुलाची ही गोष्ट आहे. माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यापासून तो प्रेरणा घेतो. आपले नावही तो कलाम ठेवतो. कलाम यांच्या भेटीसाठी दिल्लीला निघालेल्या या मुलाचा प्रवास पाहणे उद्बोधक आहे.

मासूम

Children week special:
अबालवृध्दांना भुरळ पाडलेले चित्रपट
मासूम हा बालचित्रपट नसला तरी बालकांच्या आयुष्यावर भाष्य करणारा चित्रपट नक्कीच आहे. यात जुगल हंसराज आमि उर्मिला मातोंडकर यांच्या बालकलाकाराच्या भूमिका आहेत. आईचे निधन झाल्यानंतर राहु डीकेकडे राहायला येतो. मात्र हा मुलगा डीकेचा आहे याची कल्पना त्याच्या बायकोला असल्यामुळे ती त्याचा दुस्वास करते. यावर उपाय म्हणून डीके राहुलला बोर्डिंग स्कूलला घालायचे ठरवतो. दरम्यान डीकेच आपले वडील असल्याचा खुलासा राहुलला होता. त्यानंतर तो पळून जातो आणि नाट्यमय घडामोडीनंतर कथेचा शेवट सुखद होताना या सिनेमात पाहायला मिळते. यातील गाणीही खूप लोकप्रिय झाली होती.

कोई मिल गया

Children week special:
अबालवृध्दांना भुरळ पाडलेले चित्रपट

ह्रतिक रोशन मुलांच्यामध्ये खूप लोकप्रिय आहे, याचे पहिले कारण म्हणजे कोई मिल गया हा चित्रपट. मेंदुची वाढ न झालेल्या नायकाच्या भेटीला एलियन येतो आणि दोघांची मैत्री होते. त्यानंतर त्याने आपल्या बालमित्रांसोबत केलेली धमाल मस्ती या सिनेमात पाहायला मिळते. या सिनेमातील गाणीही खूप लोकप्रिय झाली होती. आजही या चित्रपटातील जादू पाहताना तरुणही आपल्या बालपणात रमून जातात.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.