ETV Bharat / sitara

अमिताभ-इम्रानच्या चित्रपटाचं शीर्षक ठरलं, आजपासून चित्रीकरण सुरू - bollywood movie

या सिनेमात अमिताभ आणि इम्रानशिवाय क्रिती खारबांदा, सिद्धार्थ कपूर ध्रितीमान चॅटर्जी, रघुवीर यादव आणि अन्नू कपूर यांच्याही महत्तावाच्या भूमिका असणार आहेत. 'गॉड तुस्सी ग्रेट हो' चित्रपटाचे दिग्दर्शक रुमी जाफरी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत

अमिताभ-इम्रानच्या चित्रपटाचं शीर्षक ठरलं
author img

By

Published : May 10, 2019, 3:08 PM IST

मुंबई - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन बदलापाठोपाठ लवकरच आणखी एका मिस्ट्री थ्रिलर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात अमिताभ यांच्यासोबत अभिनेता इम्रान हाश्मी स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाविषयी घोषणा करण्यात आली होती. मात्र, चित्रपटाचं शीर्षक निश्चित नव्हतं.

अशात आता चित्रपटाचं शीर्षक जाहीर करण्यात आलं आहे. 'चेहरे' असं या सिनेमाचं नाव असणार आहे. सेटवरील एक फोटो शेअर करत चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. आजपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.

दरम्यान, या सिनेमात अमिताभ आणि इम्रानशिवाय क्रिती खारबांदा, सिद्धार्थ कपूर ध्रितीमान चॅटर्जी, रघुवीर यादव आणि अन्नू कपूर यांच्याही महत्तावाच्या भूमिका असणार आहेत. 'गॉड तुस्सी ग्रेट हो' चित्रपटाचे दिग्दर्शक रुमी जाफरी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. २०२० मध्ये २१ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Intro:Body:

dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.