हैदराबाद: आपल्या आयुष्यातील माहितीपूर्ण आणि सकारात्मक बाबी सांगायच्या उद्देशाने सोशल मीडिया तयार झाला. परंतु आता त्याचे एका अक्राळविक्राळात रूपांतर झाले आहे - शारीरिकदृष्ट्या नाही तर मानसिक आणि भावनिकदृष्ट्या. काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांनी एका सोशल मीडिया रॅकेटचा भांडाफोड केला, जो एकापेक्षा जास्त बनावट खात्यांचा वापर करून केवळ दुसर्याचे अनुयायी वाढवण्यासाठीच नव्हे तर समाजात भीती निर्माण करण्यासाठी वापरत असे.
ऑनलाईन ट्रोलिंग आणि गुंडगिरी ही बर्याच लोकांसाठी गंभीर समस्या बनली आहेत, विशेषत: जे लोकांच्या डोळ्यासमोर आहेत.
सेलिब्रेटींना निवडक काही लोकांच्या चुकीच्या संदेशांचा सामना करावा लागतो, ज्यांना असे वाटते की त्यांना अशा विषारी गोष्टी लिहिण्याचा अधिकार आहे. तथापि, हे केवळ संदेशांबद्दलच नाही. ट्रोलर्सनी आता त्यांच्या संदेशांतून लोकांना शारीरिक हल्ल्याची धमकी द्यायला सुरूवात केली आहे.
सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर लोकांनी नातलगत्वाच्या चर्चेला उधाण आणले आहे आणि त्याला संपूर्ण नवीन वळण दिले आहे. यामुळे करण जोहर, आलिया भट्ट, सलमान खान, सोनम कपूर यासारख्या व्यक्ती ऑनलाईन द्वेषाच्या लक्ष्य बनल्या आहेत.
अलीकडेच, आम्ही आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट यांना सोशल मीडियावरुन भरपूर ट्रोल करण्यात आले. अत्यंत वाईट शब्दात त्यांना शिव्या शाप देण्यात आले. असेच काहीसे सुशांतची कथित मैत्रिण रिया चक्रवर्तीच्या बाबतीतही घडले. अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन तिच्यावर टीका करण्यात आली.
हेही वाचा - अनुभव सिन्हाने दिला बॉलिवूडचा 'राजीनामा', पण बनवत राहणार 'सिनेमा'!!
करण जोहरलादेखील सतत सोशल मीडियावरन ट्रोल केलं जातंय. त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना धमक्या दिल्या जात आहेत. याला उत्तर देण्याची तयारी करणने सुरू केली आहे. यासाठी तो आपल्या वकिलांशी कायदेशीर सल्ला मसलत करीत आहे.
"करण सक्रियपणे कायदेशीर कारवाईचा पाठपुरावा करीत आहे. वकिलांची टीम तसेच ऑनलाइन तज्ज्ञ यासाठी एकत्र आले आहेत. टीममधील तंत्रज्ञ लोक सोशल मीडियाच्या हँडल्सचा मागोवा घेत आहेत, जे त्याला हिंसाचाराच्या माध्यमातून धमकावण्याचा प्रयत्न करीत आहेत," करण जोहरच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले.
“त्यांना ही अकाऊंट शोधायची आहेत, बनावट व खरी माहिती हवी आहे व संबंधित अधिकाऱ्यांकडे पुरावे सादर करायचे आहेत. जेव्हा लोकांनी त्याच्या मुलांना शारीरिक इजा आणि अत्याचार करण्याची धमकी दिली आणि त्याच्या आईविरूद्ध बलात्काराच्या धमक्या दिल्या तेव्हा अशी कारवाई करणे आवश्यक झालंय,” असे सूत्राने सांगितले.
इतर अनेक सेलिब्रिटींनी अशा प्रकारच्या सायबर-गुंडगिरीचा बळी ठरल्यावर अशाच विषयांवर एफआयआर दाखल केले होते. पोलिसांनी या तक्रारींचा गांभीर्याने विचार केला आहे आणि परिस्थितीचा कसून तपास करत आहेत.
ऑनलाईन गैरवर्तन किंवा हिंसक संदेश लिहित असलेल्या कोणीही आयटी कायद्याच्या कलम ६७ आणि भारतीय कायद्याच्या कलम ५०७ अंतर्गत गुन्हेगारी कारावासासह लाखो रुपये दंडासाठी पात्र ठरेल.