ETV Bharat / sitara

ट्रोलर्सना टाळण्यासाठी जान्हवी कपूरने फोटो पोस्ट करताना केली युक्ती - ताज्या अंकात जान्हवी कपूर कव्हर गर्ल

सोशल मीडियावर आपले फोटो शेअर केल्यानंतर बऱ्याचदा सेलेब्रिटीजना ट्रोल केले जाते. जान्हवी कपूरने एका मॅगझिनसाठी फोटोशूट केले. हा फोटो सोशल मीडियावर शेअरकरताना ट्रोल होऊ नये याची काळजीही तिने घेतली आहे.

Janhvi Kapoo
जान्हवी कपूर
author img

By

Published : May 4, 2021, 9:11 PM IST

मुंबई - अभिनेत्री जान्हवी कपूरने तिच्या लेटेस्ट मॅगझिनच्या कव्हर शूटचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. संभाव्य ट्रोलिंग टाळण्यासाठी जान्हवीने या पोस्टबद्दलचे स्पष्टीकरणही दिले आहे.

ट्रॅव्हल मॅगझिनच्या ताज्या अंकात कव्हर गर्ल म्हणून जान्हवीने फोटो शूट केले आहे. यामध्ये ती सिक्विन बिकिनी टॉपमध्ये निळाशार पाण्यात उंच स्लिट स्कर्टमध्ये उभी असल्याचे दिसते. सोमवारी जान्हवीने हा दंग करणारा कव्हर फोटो पोस्ट केला. त्यासोबत तिने लिहिले, "प्री कमिटेड पोस्ट आणि लॉकडाऊनच्या अगोदरचे शूट. शक्य तितके सुरक्षित राहून केलेले शूट. प्रत्येक जण सुरक्षित आणि मजबूत रहा."

ही पहिली वेळ नाही जेव्हा जान्हवीने आपले ग्लॅमरस फोटो डिस्क्लेमरसह शेअर केले आहेत. काही दिवसा पूर्वी वधूच्या वेषातील फोटो शूट तिने केले होते. त्यावेळेसही तिने अशी सावधगिरी बाळगली होती.

चित्रपटाच्या आघाडीवर जान्हवीने मार्चमध्ये तिच्या ‘गुड लक जेरी’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. त्यानंतर ती आपली बहिण खुशी कपूरसोबत वेळ घालवण्यासाठी अमेरिकेला गेली होती. जान्हवी अखेरची रुही या चित्रपटात झळकली होती, ज्यात अभिनेता राजकुमार राव आणि वरुण शर्मा मुख्य भूमिकेत होते. लॉकडाऊननंतर थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला हा पहिला चित्रपट होता.

हेही वाचा - ६० हजार लस खरेदी करण्यासाठी परवानगी द्यावी, आदित्य चोप्राचे मुख्यमंत्र्यांना साकडे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.