हैदराबाद - दक्षिण सुपरस्टार नागार्जुन अक्केनेनी याने अयान मुखर्जी दिग्दर्शित यांच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचे शूटिंग संपवले असून यात अमिताभ बच्चन, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या भूमिका आहेत.
चित्रपटाचे लेटेस्ट शेड्यूल मुंबईत शूट करण्यात आले होते. नागार्जुनने ट्विटरवर जाऊन रणबीर, आलिया आणि अयान यांच्यासह चित्रपटाच्या सेट्सवरील एक फोटो शेअर केला आहे. यात त्याने ब्रम्हास्त्रचे शूटिंग संपल्याचा आणि रणबीर, आलिया यांच्यासोबत अद्भुत अनुभव आल्याचे त्याने लिहिलंय.
दरम्यान, आलियानेही चित्रपटात एकत्र काम करतानाच्या आश्चर्यकारक आठवणींसाठी नागार्जुनचे इन्स्टाग्रामवर आभार मानले आहे.
"..आणि नागार्जुन सरांचे ब्रम्हास्त्रमधील शुटिंग पूर्ण झाले आहे. सुंदर आठवणींसाठी आभारी आहे सर... तुमच्यासोबत काम करण्याचे भाग्य लाभले. चित्रपटाचे शूटिंग आता लवकरच संपेल. मागे वळून पाहताना किती सुंदर प्रवास या सिनेमासाठी झाल्याचे जाणवते.", असे आलियाने लिहिले आहे.
ब्रह्मास्त्र चित्रपटात अभिनेत्री डिंपल कपाडिया आणि मौनी रॉय देखील मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटामध्ये सुपरस्टार शाहरुख खानची खास भूमिका असणार आहे.
करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन आणि फॉक्स स्टार स्टुडियोजने एकत्रित केलेला 'ब्रह्मास्त्र' हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होईल.
हेही वाचा - शाहरुख खानच्या ‘डार्लिंग्स’मध्ये आलिया भट्ट मुख्य भूमिकेत!