मुंबई - भारतीय क्रिकेट संघाने १९८३ मध्ये मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाची गाथा ८३ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग हा कपील देव यांची व्यक्तीरेखा साकारतोय. या चित्रपटाच्या शूटींगची पूर्वतयारी झाली असून आता बोमन इराणी यात काम करणार असल्याची घोषणा झाली आहे.
-
Boman Irani to enact the part of Farokh Engineer in #83TheFilm... Stars Ranveer Singh as #KapilDev... Directed by Kabir Khan... 10 April 2020 release. #Relive83 pic.twitter.com/aiixjLYoOv
— taran adarsh (@taran_adarsh) August 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Boman Irani to enact the part of Farokh Engineer in #83TheFilm... Stars Ranveer Singh as #KapilDev... Directed by Kabir Khan... 10 April 2020 release. #Relive83 pic.twitter.com/aiixjLYoOv
— taran adarsh (@taran_adarsh) August 27, 2019Boman Irani to enact the part of Farokh Engineer in #83TheFilm... Stars Ranveer Singh as #KapilDev... Directed by Kabir Khan... 10 April 2020 release. #Relive83 pic.twitter.com/aiixjLYoOv
— taran adarsh (@taran_adarsh) August 27, 2019
बोमन इराणी या चित्रपटा फारुख इंजिनिअर यांची व्यक्तीरेखा साकारणार आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडेल की, फारुख इंजिनिअर तर १९८३ च्या भारतीय संघात नव्हते. तर मग या सिनेमात कसे? तुमचा प्रश्न रास्त आहे. भारतीय संघाचा तडाखेबंद फलंदाज आणि विकेट किपर राहिलेल्या इंजिनिअर यांनी १९५९ ते १९७५ पर्यंत भारतीय क्रिकेटची सेवा केली. निवृत्तीनंतर त्यांनी समालोचक म्हणून काम केले. १९८३ मध्ये झालेल्या विश्वचषकाचे ते समालोचक होते. हाच दुवा ८३ या चित्रपटात दाखवला जाणार आहे.
फारुख इंजिनिअर यांचा या विश्वचषकाच्या काळातील एक कॉमेंट ऐतिहासिक ठरली होती. फारुख इंजिनिअर हे बीबीसीसाठी टेस्ट मॅच स्पेशालिस्ट म्हणून कॉमेंटरी करीत असत. १९८३ मध्ये विश्वचषक मॅचेस कव्हर करीत असताना कॉमेंटिटर ब्रिआन जॉन्स्टन यांनी त्यांना एक प्रश्न विचारला. 'भारत या विश्वचषकात जर विजयी झाला तर भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी भारतात सार्वजनीक सुट्टी जाहीर करतील का?' फारुक इंजिनिअर यांनी तातडीने सांगितले की, 'शंकाच नाही, त्या जर कॉमेंटरी ऐकत असतील तर त्या तसे जरुर करतील आणि त्या क्रिकेट कॉमेंटरी ऐकणाऱ्या आहेत.'
काही वेळातच इंदिरा गांधींच्या कार्यालयातून कॉमेंटरी टीमला संदेश आला की, ''त्यांनी कॉमेंटरी ऐकली असून त्यांनी सुट्टीचा निर्णय जाहीर केला आहे.'' फारुख इंजिनिअर यांनी हा किस्सा काही महिन्यानंतर इएसपीएन क्रिकइन्फोमध्ये दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता.
अशा या जिगरबाज फारुख इंजिनिअर यांची व्यक्तीरेखा बोमन इराणी साकारणार आहेत. कॉमेंटरीचा हा किस्सा चित्रपटात असेल अशी अपेक्षा आपण करुयात.