ETV Bharat / sitara

बॉलिवुडच्या प्रसिद्ध गायिकेला कोरोनाची लागण - Bollywood singer tested positive for coronavirus

कोरोना झालेल्या गायिकेने म्हटले आहे, गेल्या ४ दिवसांपासून मला फ्ल्यूची लक्षणे दिसून आली आहेत. आज कोविड-१९ झाल्याचा रिपोर्ट आला आहे. मी आणि माझे कुटुंब पूर्ण विलगीकरणात आहोत. सर्व वैद्यकीय सूचनांचे पालन करत आहोत.

कनिका कपूर
कनिका कपूर
author img

By

Published : Mar 20, 2020, 2:55 PM IST

Updated : Mar 20, 2020, 5:00 PM IST

मुंबई - देशभरात कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जगभरातील बऱ्याच सेलेब्रिटींनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. आता बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका कनिका कपूरलाही कोरोनाची लागण झाली आहे. कनिकाने स्वत: याबाबतची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.

कनिकाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे, की 'मागच्या ४ दिवसांपासून मला कोरोनाची लक्षणं दिसत होती. मी माझी तपासणी केल्यानंतर मला कोरोनाची (कोव्हीड - १९) लागण असल्याचे स्पष्ट झाले आहे. मी सध्या माझ्या कुटुंबीयासोबत पूर्णत: विलगीकरणात राहत आहे. तसेच, डॉक्टरांच्या सल्ल्याने काळजी घेत आहोत'.

हेही वाचा -कोरोनामुळे मिळालेल्या वेळेचा सलमान खानने 'असा' केला उपयोग, पाहा व्हिडिओ

कनिका अलिकडेच लंडनवरून परतली आहे. तिच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही कोरोना तपासणी केली जात आहे.

कनिकाने आपल्या आजाराची माहिती दिल्यानंतर नागरिकांना सुरक्षा बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच, भीती न बाळगता जागरुक राहण्याचा सल्लाीह तिने नागरिकांना दिला आहे.

हेही वाचा -कोरोनामुळे 'फ्रेंड्स'चं रियुनियन पुढे ढकललं

Last Updated : Mar 20, 2020, 5:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.