हैदराबाद - बॉलीवुडचे महानायक, बादशाह, अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन आज ७८ वर्षांचे झाले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हिंदी सिनेमांची माहिती घेऊ.
क्राईम थ्रिलर जंजीरमधील विजयच्या शानदार भूमिकेमुळे अमिताभ बच्चन यांना अँग्री यंग मॅन अशी ओळख मिळाली. बिग बीच्या करियरला महत्त्वपूर्ण वळण लागले. त्यानंतर बॉलीवुड फिल्मधील रोमान्ससह अॅक्शनचे स्वरुपच पालटले. द अँग्री यंग मॅननंतर बच्चन हे एक स्टार म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यानंतर त्यांचा बॉलीवुडमधील संघर्षही संपला.
हेही वाचा-क्रिकेट खेळतानाचा अमिताभ बच्चन यांचा दुर्मिळ फोटो, म्हणतो, "बॅट छोटी पडली"
जंजीरने अमिताभ यांना रात्रीतच स्टारडम मिळून दिले. १९७५ मध्ये अॅक्शन ड्रामा असलेला दीवारही सुपरहिट ठरला. या सिनेमाने त्यांची अँग्री यंग मॅन ही ओळख आणखी लोकप्रिय झाली. 'आज खुश तो बहुत होंगे तुम' हा त्यांचा डायलॉग आजही कायमचा संस्मरणीय ठरला आहे.
हेही वाचा-KBC 13: अमिताभ बच्चनने दाखवली अभिषेक आणि आराध्याने दिलेली भेट
सलग सिनेमा हिट देऊन घडविली कारकीर्द
१९७५ मधील शोलेने तेव्हा देशात सर्वाधिक कमाई केली. शोलेमधील जयच्या भूमिकेने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर ठसा निर्माण खेला. शोलेनंतर त्यांनी सिनेमाच्या कारकीर्दीमध्ये मागे वळून बघितले नाही. कभी कभी (1976), अमर अकबर एंथनी (1977), डॉन (1978), त्रिशूल (1978), मुकद्दर का सिकंदर (1978) बेशरम (1978), सुहाग (1979), मिस्टर नटवरलाल (1979), शान (1980), याराना (1981), सत्ते पे सत्ता (1982) असे त्यांनी सलग हिट सिनेमा दिले आहेत.
हेही वाचा-'चेहरे'मध्ये अमिताभ बच्चनचा 8 मिनीटांचा डायलॉग, ‘वन-टेक’ शुट करुन 'बिग बी' यांनी केला विक्रम
अनेक पुरस्कारांनी बिग बीचा करण्यात आला आहे सन्मान
महानायक म्हणून ओळखले जाणाऱ्या अमिताभ बच्न यांना पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषणसहित अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय सिनेमाध्ये सर्वोच्च पुरस्कार असलेला दादासाहेब फाळके अॅवार्डही अमिताभ बच्चन यांना देण्यात आला आहे. सोशल मीडियात सक्रिय असलेल्या अमिताभ बच्चन यांनी वाढदिवसानिमित्त गमतीशीर ट्विट केले आहे.
गतवर्षी बच्चन कुटुंब कोरोनामुळे सापडले होते संकटात
खरं तर बीग बी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करतात. त्यांना आपला वाढदिवस कायम कामात घालवायला आवडतो. गेले वर्ष तसं बच्चन कुटुंबासाठी थोडं त्रासाचं गेलं, कारण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर त्यांचं कुटुंब देखील या तडाख्यातून वाचू शकलं नाही. खुद्द बीग बींना देखिल कोरोना झाला. त्यांच्यापाठोपाठ त्यांचा मुलगा अभिषेक, त्याची पत्नी ऐश्वर्या आणि नात आराध्या हे देखील कोरोना पॉझिटीव्ह झाले होते. त्यामुळे तब्बल १४ दिवस त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली नानावटी रूग्णायलयात रहावं लागलं. त्यानंतर ते सुखरूप घरी परतले. मात्र त्यानंतर त्यांनी आपल्या वागण्याला एक शिस्त लावून घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कौन बनेगा करोडपती या गेम शोचं शुटिंग सुरू झाल्यानंतर देखील राज्य सरकारने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचं त्यांनी काटेकोरपणे पालन करायला सुरूवात केली.
कोरोनामुळे बंगल्याच्या आवारातील पत्रकार परिषदेला पडला खंड
दरवर्षी बीग बी यांचा वाढदिवस म्हटलं की त्यांच्या बंगल्याला नावाप्रमाणेच जलशाचं स्वरूप प्राप्त होतं. मुंबई आणि मुंबई बाहेरील हजारो फॅन्स त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानासमोर गर्दी करतात. बीग बी देखील घराबाहेर येऊन प्रेक्षकांना अभिवादन करून या शुभेच्छांचा स्वीकार करतात. त्यानंतर माध्यमांना बंगल्याच्या आवारात बोलवून त्यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतात. काही निवडक पत्रकारांना वैयक्तिकरित्या भेटून त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याची संधी यानिमित्ताने मिळते. मात्र, गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बच्चन यांना लोकांमध्ये मिसळता आले नाहीत. मध्यरात्रीच काही चाहत्यांनी त्यांच्या जलसा या घरासमोर वाढदिवस साजरा केला.