ETV Bharat / sitara

ई टीव्ही भारत स्पेशल : लॉकडाऊनमुळं बॉलिवूडचं जवळपास तीन हजार कोटींचं नुकसान! - कधी सुरळीत होणार याबाबत अनिश्चितता.

गेली चार महिन्याहून अधिक काळ फिल्म इंडस्ट्रीत सर्व कामे ठप्प झाली आहेत. कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याने शुटिंग्ज, मार्केटींग, प्रमोशन, डिस्ट्रीब्युशन अशा सिनेमा क्षेत्राशी संबंधित सगळीच क्षेत्र ठ्प्प झाली होती. याचा परिणाम असा झाला की, गेल्या पाच महिन्यात अडीच ते तीन हजार कोटी रुपयांपर्यंतचा फटका इंडस्ट्रीला सहन करावा लागला असल्याचं मत ट्रेड पंडित गिरीष जोहर यांनी ‘ई टीव्ही भारत'शी बोलताना स्पष्ट केलं.

bollywood-loses-rs-2500-crore-due-to-lockdown
लॉकडाऊनमुळे बॉलिवूडचं अडीच ते तीन हजार कोटींचे नुकसान!
author img

By

Published : Aug 7, 2020, 9:32 PM IST

मुंबई - ६ मार्चला टायगर श्रॉफचा ‘बागी ३’ रिलीज झाला आणि अपेक्षेप्रमाणे पहिल्या आठवड्यातच त्याने १०० कोटींना गवसणी घातली, मात्र तोपर्यंत बॉलिवूडमध्ये कुणालाही पुढे नक्की काय वाढून ठेवलं आहे याची कदाचित कल्पना नसावी. पुढच्या तीन आठवड्यात तो किती कोटींना गवसणी घालणार याची चर्चा सुरू असतानाच, २६ मार्चला कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि हा लॉकडाऊन १५-१५ दिवस करत मारूतीच्या शेपटाप्रमाणे वाढतच गेला. भारतातच नाही तर जगभरातील अनेक देशांना याचा फटका बसला त्यामुळे संपूर्ण जगच जणू लॉक झालं आहे अशी परिस्थिती निर्माण झाली.

लॉकडाऊनमुळे बॉलिवूडचं अडीच ते तीन हजार कोटींचे नुकसान!

मुंबईसह परदेशात होणारी शुटिंग्ज ठप्प झाली..आणि बॉलिवूडच नव्हे तर संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीला चिंता सतावायला लागली ती पुढे काय होणार याची..मार्च ते जुलै असे पाच महिने लॉकडाऊन पाळल्यानंतर जुलैच्या अखेरच्या आठवड्यात टीव्ही मालिकांना काही अटींवर शुटींगची परवानगी देण्यात आली. तर ऑगस्टपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली. दुसरीकडे कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याने शुटिंग्ज, मार्केटींग, प्रमोशन, डिस्ट्रीब्युशन अशा सिनेमा क्षेत्राशी संबंधित सगळीच क्षेत्र ठ्प्प झाली होती. याचा परिणाम असा झाला की, गेल्या पाच महिन्यात अडिच ते तीन हजार कोटी रूपयांपर्यंतचा फटका इंडस्ट्रीला सहन करावा लागला असल्याचं मत ट्रेड पंडित गिरीष जोहर यांनी ‘ई टीव्ही भारत'शी बोलताना स्पष्ट केलं.

देशभरातील सर्व भाषांमध्ये मिळून वर्षाला १४ हजार सिनेमांची निर्मिती होते. तर हा आकडा बॉलिवूडमध्ये २५० ते ३०० एवढा आहे. मात्र गेल्या पाच महिन्यात शुटिंग बंद राहिल्याने या क्षेत्राला मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. दुसरीकडे देशातील चित्रपट उद्योगावर अवलंबून असणाऱ्या कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. शुटिंगच्या जागी मोजकेच कामगार घेऊन शूट करण्याची अट सरकारने घातल्यामुळे ज्या टीव्ही किंवा सिनेमाच्या शुटिंगसाठी ५० कामगार काम करायचे तिथे आज फक्त २५ कामगार काम करत आहेत. याचाच अर्थ निम्या कामगारांना आपला रोजगार कायमचा गमवावा लागला आहे. मात्र चित्रपट उद्योगाकडे पाहण्याची पूर्वग्रहदोषीत पद्धत आजही रूढ असल्याने या क्षेत्राचा त्यातील अडचणींचा नीट विचार होतच नाही अशी खंत ख्यातनाम सिने समीक्षक दिलीप ठाकूर यांनी ‘ई टीव्ही भारत’शी बोलताना व्यक्त केली आहे.

ओटीटीचं आगमन थिएटर्सची गळचेपी

कोरोनाच्या तडाख्याने देशांतर्गत आणि देशाबाहेर देखील सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचे सारे मार्ग ठ्प्प झाले. यावर तोडगा काढण्यासाठी ओटीटीचा एकमेव मार्ग निर्मात्यांना दिसला. असं असलं तरिही ओटीटीवर जाणं सर्वच निर्मात्यांना शक्य झालं नाही. लॉकडाऊन पूर्वी शुटिंग पूर्ण झालेले सिनेमे, पोस्ट प्रोडक्शनमध्ये अडकलेले सिनेमे यांनी ओटीटीचे दरवाजे ठोठावले. त्यामुळे बड्या स्टार्सचे काही सिनेमे नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राईम, डिस्ने हॉटस्टार, एमएक्स प्लेअर, झी फाईव्ह, सोनी लिव्ह अशा काही प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आले. लोक घरात अडकून पडलेली असल्याने आणि टीव्हीवर देखील रिपीट मालिका सुरू असल्याने प्रेक्षकांनी ओटीटीचं माध्यम आपलंस केलं. बनवलेल्या सिनेमाची चांगली किंमत मिळत असल्याने निर्माते खूश झाले, बड्या स्टार्सचे नवे सिनेमे पदरात पडल्याने ओटीटी प्लॅटफॉर्म खूश झाले, तर एकाच वेळी देशा परदेशातील २०० हून अधिक देशात सिनेमा पोहचत असल्याने स्टार्स आणि दिग्दर्शक देखील खूश झाले.

याचा फटका बसला तो फक्त पारंपारिक पद्धतीने सिनेमा वितरण करणाऱ्या वितरकांना, कोणत्याही सिंगल स्क्रिन अथवा मल्टीप्लेक्समध्ये पॉपकॉर्न विकणाऱ्या कर्मचाऱ्यापासून तिकिट विक्री करणारे, स्वच्छतागृहांची स्वच्छता राखणारे, आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षा देणारे, पार्किंगची व्यवस्था पाहणारे असे अनेक कामगार काम करत असतात. देशभरातील १४ हजार थिएटर्समध्ये असे सुमारे २० लाख कर्मचारी काम करतात. अशा सगळ्यांचा रोजगारावर अनिश्चिततेचे सावट असून काही थिएटर्स कायमची बंद झाल्याने हा कामगार देशोधडीला लागला आहे. असं असलं तरिही जगभरात काही देशांमध्ये आता थिएटर्स सुरू करण्यात आलेली आहेत. आजच्या तारखेला जगातली ४८ टक्के थिएटर्स सुरू झालेली आहेत. भारतातील थिएटर्स काही अटींनीशी सुरू झाली तर या परिस्थितीत काही अंशी दिलासा मिळू शकेल. ‘सुर्यवंशी’, ‘८३’, ‘राधे’ असे काही बड्या स्टार्सचे क्राऊड पुलर सिनेमे थिएटर्समध्ये रिलीज झाले तर पुन्हा एकदा परिस्थिती पूर्वपदावर यायला त्याची मदत होऊ शकेल. मात्र ते व्हायला अजून किती दिवस लागलीत ते सांगता येणं अवघड आहे.

बड्या स्टार्सचं वेट अँण्ड वॉच

बॉलिवूडमध्ये निर्मात्यांना जसे टाकलेले पैसे वसूल कसे होणार याची चिंता आहे, तशीत स्टार्सना त्यांच्या जीवाची चिंता आहे. कोरोनावर लस शोधण्यासाठी जगभरातून प्रयत्न सुरू असले तरिही अद्याप लस मिळालेली नाही. त्यामुळे लस मिळत नाही तोवर शुटिंग सुरू करायची रिस्क घ्यायला बडे स्टार्स तयार नाहीत. भारतातील २० मोठे अभिनेते आणि अभिनेत्री यांनी तुर्तास तरी शुटिंग करायला नकार दिलेला आहे. खुद्द सलमान खानने त्याच्या ‘राधे’ सिनेमाचं एक शेड्युल पूर्ण होऊनही पुढचं शेड्युल २०२१ पर्यंत पुढे ढकललं आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासारखा ऍड वर्ल्डमधील तज्ज्ञांचा आवडता कलाकार पाच महिन्यांपासून वयाच्या अटीत बसत नसल्याने घरी बसून होता. दीपिका, कॅटरिना, रणवीर सिंग यांचे सिनेमांचं शुटिंग अनिश्चित काळापर्यंत पुढे ढकलले गेले आहे.सिनेमांची शुटिंग सुरू नसल्याने, मेकअपमन, ड्रेसवाले, फॅशन डिझायनर्स, प्रोडक्शन, लाईटमन, स्पॉटबॉय, सेटींगवाले, व्हॅनिटी वाले, ज्युनियर आर्टीस्ट, मॉब डान्सर्स, कॅटरिंगवाले सगळ्यांचेच व्यवसाय ठप्प झाले आहेत. मुंबईत महिन्याला होणाऱ्या शुटिंगमधून साधारण ६०० कोटींची उलाढाल होते. ही सगळी उलाढाल आजच्या घडीला ठप्प आहे. यात अपवाद ठरला आहे तो अभिनेता अक्षय कुमारचा, नुकतंच त्याच्या आगामी ‘बेल बॉटम’ या सिनेमाच्या शुटिंगची टीम युके, आयर्लंड इथं शुटिंगसाठी रवाना झाली आहे. कोरोना प्रादुर्भावानंतर शुट होणारा ‘बेल बॉटम’ हा पहिला बॉलिवूड सिनेमा ठरला आहे. मात्र तुर्तास तरी अडिच ते तीन हजार कोटींचं नुकसान सहन करणाऱ्या इंडस्ट्रीला केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारांकडून तातडीचा दिलासा मिळणं गरजेचं आहे.

सगळं कधी सुरळीत होणार याबाबत अनिश्चितता..

आजच्या घडीला या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कलाकार आणि कामगार यांना हा एकच प्रश्न सतावतो आहे आणि तो म्हणजे सगळं कधी सुरळीत होणार..? देशातील कोरोना केसेसचा आकडा आटोक्यात येत नसला तरिही थांबून राहता येणं आता शक्य नाही. त्यामुळे कोरोनासोबत काही नियम पाळून जगावं लागणार आहे. एकिकडे मालिकांची शुटिंग सुरू झाली आहेत. दुसरीकडे सिनेमांच्या शुटिंगला देखील सुरूवात होते आहे. मात्र मुंबईत अजूनही शुटिंग्ज सुरू झालेली नाहीत. गेल्या पाच महिन्यात भारतीय चित्रपटसृष्टीचं अपरिमित नुकसान झालेलं आहे. ते भरून काढण्यासाठी किमान एक ते दोन वर्ष लागण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या नंतर जग बदललं असून फिल्म इंडस्ट्री देखील बदलणार आहे...काही जणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार हे स्पष्ट असल्याने जमेल त्या पर्यायी मार्गाचा स्वीकार करावाच लागणार आहे. दुसरीकडे बड्या कलाकारांना आज नाही तर उद्या जोखीम पत्करून शुटिंगसाठी बाहेर पडावंच लागेल. तरच एक इंडस्ट्री म्हणून या परिस्थितीला तोंड देणं आपल्याला शक्य होईल. मात्र त्यापूर्वी कोरोनापेक्षा भयंकर अशा बेरोजगारी आणि आर्थिक अडचण अशा दुष्टचक्रातून चित्रपटसृष्टीला बाहेर काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला मिळून काही प्रश्नांवर तातडीचा दिलासा हा द्यावाच लागेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.