ETV Bharat / sitara

'जनता कर्फ्यू सेलेब्रिशन'च्या हुल्लडबाजीची बॉलिवूड सेलेब्रिटीजने उडवली खिल्ली - 'जनता कर्फ्यू सेलेब्रिशन'च्या हुल्लडबाजीची बॉलिवूड सेलेब्रिटीजने उडवली खिल्ली

रविवारी जनता कर्फ्यूनंतर लोकांनी जोरदार केलेल्या सेलेब्रिशनचे बॉलिवूड सेलेब्रिटीजनी खिल्ली उडवली आहे. ५ वाजता ५ मिनीटे इनिशिटीव्हचा लोकांना अर्थच कळला नसल्याचे त्यांनी म्हटलंय.

Bollywood criticizes Janata curfew
जनता कर्फ्यू सेलेब्रिशन
author img

By

Published : Mar 23, 2020, 6:53 PM IST

मुंबई - अभिनेत्री सोनम कपूर, रिचा चढ्ढा, निम्रत कौर यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलेब्रिटीजनी रविवारी पार पडलेल्या जनता कर्फ्यूनंतर लोकांनी रस्त्यावरुन मिरवणुका काढल्या त्यावर जोरदार टीका केली आहे. कोरोना व्हायरसटचा प्रार्दुर्भाव रोखण्यासाठी लोकांनी एकत्र येऊ नये यासाठी खास सूचना दिल्या जाऊनही लोकांनी त्याचे साफ उल्लंघन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्यूचे आवाहान जनतेला केले होते. कोरोना व्हायरस रोखण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी संध्याकाळी ५ वाजता सर्वांनी घराच्या खिडकीत किंवा गच्चीत येऊन टाळ्या आणि घंटानाद करण्याचे आवाहनही करण्यात आले होते.

असे असले तरी रविवारी संध्याकाळी ५ वाजता लोक मोठ्या संख्येने केवळ रस्त्यावर उतरले नाहीत तर त्यांनी मिरवणुकाही काढल्या. थाळ्या वाजवत, वाद्यांचा गजरात काहींनी डान्सही केला. काहींनी तर करोना गरबादेखील खेळला.

  • The attitude behind the circus that’s unfolded in so many parts of the country over “celebrating” the end of #Covid19 is the exact reason why we should be so worried for India. Praying the price we pay for this utter embarrassment and horror isn’t irreversible and drastic.

    — Nimrat Kaur (@NimratOfficial) March 22, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यासर्व गोष्टींवर निम्रत कौरने टीका करीत लिहिलंय, ज्या गोष्टीची चिंता वाटत होती नेमकी तिच गोष्ट या सेलेब्रिशनमध्ये असल्याचे या सर्कसच्या मानसिकतेतून दिसून आले. या भयानक आणि कधीही न बदलणाऱ्या कृत्याची किंमत आपण चुकती करीत आहोत आणि यापुढेही करावी लागेल.

रिचा चढ्ढाने गल्लीत डान्स करणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ शेअर करीत त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, मुर्खपणाची सीमा ओलांडली गेली आहे. ही गोष्ट जनता कर्फ्यूच्या नेमकी उलट आहे.

काही व्हिडिओना रिट्विट करीत सोनम कपूरने लिहिलंय, हसण्यापेक्षाही जास्त दुःखद असल्यामुळे शेअर करीत आहे.

  • धन्यवाद सर। एक बार आपकी डाँट की भी आवश्यकता है इन लोगों को। https://t.co/IuqoWAKBgJ

    — Anubhav Sinha (@anubhavsinha) March 23, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जनता कर्फ्यूनंतर दुसऱ्याच दिवसी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारांना लॉक डाऊनचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांचे ट्विट शेअर करीत अनुभव सिन्हा यांनी लिहिलंय, धन्यवादसर, पुन्हा एकदा तुमच्या रागावण्याचीही आवश्यकता आहे या लोकांसाठी.

करण जोहरने सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व सांगताना लिहिलंय, वेगळे राहा किंवा वेगळे व्हा. तुमची मर्जी. #IndiaFightsCorona

अभिनेत्री कृतिका कामरा, क्रिती सेनॉन, गिप्पी अग्रवाल आणि निया शर्मा यांनीही अशा लोकांचा निषेध केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.