मुंबई - कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत, पण संपलेले नाहीत. बॉलिवूड सेलिब्रिटीही कोरोनाला बळी पडू लागले आहेत. बातमीनुसार, करिना कपूर (Kareena Kapoor) खान आणि अमृता अरोरा (Amrita Arora)कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. मुंबई महानगर पालिका (BMC) ने करिना कपूर आणि अमृता अरोरा यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची RTPCR चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत.
अलीकडेच करिना कपूर खान आणि अमृता अरोरा यांना अनेक पार्ट्यांमध्ये दिसले होते. दोन्ही अभिनेत्री कोरोना प्रोटोकॉलचे उल्लंघन करताना ( actress violated the Corona protocol) दिसल्या. या अभिनेत्रींकडून अद्याप हेल्थ अपडेट जारी करण्यात आलेले नाही.
यापूर्वी अभिनेता कमल हसन यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. कमल हसन यांनी ट्विट करून माहिती दिली होती. त्यांनी लिहिले होते की, "अमेरिकेच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर थोडा खोकला झाला. तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. मी सध्या रुग्णालयात आयसोलेटेड आहे. महामारी अजून संपलेली नाही. सर्वजण सुरक्षित रहा."
करिना-अमृतापूर्वी काजोलची बहीण तनिषा मुखर्जीने ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली होती. याशिवाय साऊथ इंडस्ट्रीतील मेगास्टार कमल हसन यांनीही त्यांना कोरोना झाल्याची पुष्टी केली आहे. अभिनेता अमित साधने देखील त्याच्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी चाहत्यांशी शेअर केली होती.
करिना कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ही अभिनेत्री लवकरच आमिर खानसोबत 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. जे लोकांना खूप आवडले होते.
हेही वाचा - 'दंगल'गर्ल सान्या मल्होत्रा, फातिमा सना शेखसोबत विकी कौशल करणार स्क्रिन शेअर